Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

कन्नड:फिर्यादीच निघाला आरोपी

लाखोंचा माल हडप करण्याच्या उद्देशाने चोरीचा केला बनाव

स्थानिक गुन्हे शाखा आणि कन्नड ग्रामीण पोलिसांची कारवाई

9 जणांच्या आवळल्या मुसक्या

कन्नड / कल्याण पाटील
लाखोंचा माल चोरीचा झाल्याचा बनाव करून लाखो रुपये हडप करण्याच्या बनाव करणारा फिर्यादीच आरोपी निघाला असून स्थानीक गुन्हे शाखा व कन्नड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादिसह नऊ आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबद अधिक माहिती अशी की, 23 सप्टेंबर रोजी पवन भागवत पाटील रा.बोरखेडा ता.चाळीसगाव हल्ली मुक्काम वाघोली ता.हवेली जी.पुणे याने कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की, त्याच्या स्वत:च्या मालकीच्या आयशर ट्रक मध्ये दिनांक २२ सप्टेंबर रोजी आयटीसी कंपनी पुणेचा सिगारेट, बिस्कीट, सेनीटायझर आदी माल घेऊन जळगाव साठी निघाला होता. कन्नडशहराच्या अलीकडे नविन टोलनाक्याजवळ रात्रीच्या वेळी फिर्यादिस झोप आल्याने ट्रक तेथेच लावुन झोपी गेलो. सकाळी उठल्यानंतर असे लक्षात आले की, गाडीची ताडपत्री वरील टपाच्या बाजुने फाडुन
अज्ञात चोरटयाने माझ्या गाडीतील सिगारेट, बिस्कीट व इतर माल चोरुन नेला आहे त्यावरुन मालाची शहानिशा करुन पो.ठाणेस फिर्याद दिली आहे.
सदर फिर्यादवरुन तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांचे तसेच ग्रामीण पोलीस ठाणे कन्नड यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले तापसाअंती गुन्हा हा फिर्यादी पवन भागवत पाटील
व त्याचे वडील नामे भागवत एकनाथ पाटील यांनी त्यांच्या साथीदारांसह केलेला असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरुन आरोपी व चोरी गेल्या मालाचा शोध घेणे कामी स्थागुशाच्या एका पथकास जळगाव जिल्हा तसेच दुसऱ्यापथकास बीड जिल्हयात रवाना करण्यात आले. दिनांक ०३ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हयातील नगरदेवळा येथुन सतिष परमेश्वर पाटील वय ४८ वर्ष यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने सांगितले की मी माझ्या मालकीचा आयशर ट्रक हा भागवत पाटील यांच्या सांगणेवरुन कन्नड येथील नविन टोलनाक्याजवळघेऊन आलो होतो व तेथुन सिगारेट, बिस्कीटचे बॉक्स माझ्या गाडीत टाकुन माजलगाव येथील शेख तौफीक शेख रफिक यास नेऊन दिले आहे तसेच काही सिगारेटचे बॉक्स हे शरद नागराज सोनवणे वय ३७
वर्ष,रा.निंभोरा ता.सोयगाव याचे पिकअप मध्ये भरुन त्याने माझ्या घरी नेऊन ठेवले होते ते सिगारेट बॉक्स
दोन तीन दिवसानंतर भागवत पाटील यांनी माझ्या घरी येऊन घेऊन गेले व तेही बॉक्स हे माजलगाव येथील
शेख तौफीक यास दिले असल्याचे समजले आहे अशी हकीगत सांगत असल्याने सदरचा गुन्हा हा स्वतःफिर्यादी त्याचे वडील भागवत पाटील व त्यांचे इतर साथीदार नामे राजेंद्र तुकाराम शेळके रा.लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव तसेच ,शेख तौफीक शेख रफिक वय २८ वर्ष, रा.फुलेनगर, माजलगावता.माजलगाव जि.बीड,,अलीम अत्तार अहमद अत्तार वय २५ वर्ष, रा.अशोकनगर माजलगाव जि.बीड,वसीम मजीद बागवान वय २७ वर्ष, रा.फुलेनगर, माजलगाव ता.माजलगाव जि.बीड, प्रतीक दिलीपकुमार ललवाणी रा.समर्थनगर,माजलगाव ता.माजलगाव जि.बीड,राजेंद्र दीपक मंत्री रा.समर्थनगर अंबड ता अंबड जी.जालना आदींनी मिळुन केलेला आहे. या प्रकरणी नऊ आरोपीना कन्नड पोलीस ग्रामीण पोलिस ठाणे येथे अटक करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव पोलीस निरीक्षक सुनील नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे हे पुढील तपास करत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close