Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

तेली समाजाने जगाबरोबर चालले पाहिजे – विजय चौधरी

तेली समाजाने जगाबरोबर चालले पाहिजे – विजय चौधरी

औरंगाबाद : तेली समाजाने व संपूर्ण ओबीसींनी जगाबरोबर चालण्याची तयारी ठेवली पाहिजे त्यासाठी घातक रूढी-परंपरा टाकून दिल्या पाहिजेत असे आवाहन महाराष्ट्र तेली समाजाचे नेते , भाजपचे नंदूरबार जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी तेली सेनेच्या योद्धा सत्कार कार्यक्रमात बोलताना केले .

हेही वाचा कोरोना लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

इनव्हिटो हॉल येथे 31 जानेवारी 2021 रोजी तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्या वतीने तेली समाजातील जिल्ह्यातील कोरोना योद्धा आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .  यावेळी तेली समाज दिनदर्शिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा साष्टपिंपळगावातील :मराठा उपोषण स्थगित केंद्राय आरक्षणा साठी :मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पुढे बोलताना विजय चौधरी म्हणाले की , तेली सेनेने आयोजित केलेला हा सत्कार कार्यक्रम उल्लेखनीय व अत्यंत महत्त्वाचा आहे.  गणेश पवार हे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी समाजासाठी केलेले कार्य व कोरोना महामारीच्या काळात केलेले समाजकार्य महत्त्वाचे आहे . तेली समाज आणि ओबीसींच्या प्रगतीबाबत बोलताना ते म्हणाले की,  समाजाने शिक्षण घेतले पाहिजे , बेरोजगारांसाठी कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत,  तसेच घातक रूढी, परंपरांचा त्याग केला पाहिजे . आम्ही नंदुरबार व धुळे जिल्ह्यात साखरपुड्यांसारखे कार्यक्रम आता बंद केले असून याकडे चौधरी यांनी विशेष लक्ष वेधले.

गणेश पवारांनी या पुढील काळात आणखी चांगले कार्यक्रम हाती घ्यावेत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असे ते म्हणाले . सदर कार्यक्रमात माजी महापौर बापू घडामोडे यांनीही मार्गदर्शनपर व प्रेरणादायी भाषण केले . ते म्हणाले की,  वाद घातला की समाजाची मोठी अधोगती होते आणि संवाद साधला की समाजाची प्रगती होते . ओबीसींनी आता एकत्र आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कचरू वेळंजकर, नारायण दळवे, भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर,  भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा मनीषा भन्साळी, भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस शालिनीताई बुंधे आदींची यावेळी भाषणे झाली . या सर्वांनी गणेश पवारांच्या कार्याची प्रशंसा केली .
हेही वाचाBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेलीसेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की , तेली समाजाच्या प्रश्नांवर आगामी काळात आंदोलने केली जाणार आहेत . सर्वांना सोबत घेऊन आपण पुढची वाटचाल करणार आहोत . विजयभाऊ चौधरी, बापू घडामोडे हे आपले मार्गदर्शक नेते आहेत.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री उचित यांनी केले . या कार्यक्रमास तेली समाजातील जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य आणि कोरोना योद्धे व तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजेंद्र तोंडे , भगवान मिटकर, विशाल नांदरकर, अशोक लोखंडे आदींनी परिश्रम घेतले.
हेही वाचा तुम्ही जुनी गाडी वापरताय का? तुमची गाडी भंगारात जाणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय वाचा News

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close