Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी तालुकानिहाय कार्यशाळा घेणार : डॉ.विजयकुमार फड


उस्मानाबाद – शासनाच्या विविध योजना हे सर्वसामान्यांना समोर ठेवून त्यांच्या फायद्यासाठी तयार केलेल्या असतात. मात्र या योजनांची माहिती अनेकांना मिळत नसल्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्यांना होत नाही तो फायदा त्यांना मिळावा त्याबरोबरच त्या योजनांची सर्व माहिती व्हावी या उद्देशानेच तालुकानिहाय शासनाच्या योजनांची माहिती व्हावी यासाठी तालुकानिहाय कार्यशाळा घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी आयोजित परिचय कार्यक्रमात दिली.२५ नोव्हेंबर रोजी दिली.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले व पाणीपुरवठा व स्वच्छता अभियान कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार उपस्थित होते.  हितगूज करताना ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांविषयी टीका-टिप्पणी करण्याऐवजी व्यवस्थितरित्या काम करून एकत्रितरित्या राहावे. हेतुपुरस्सरपणे कोणाचेही नुकसान होणार नाही यासाठी कोणत्याही चुका करू नयेत. तसेच आपण लोकसेवक आहोत याची जाण ठेवून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन शासनाच्या विविध योजना राबवून विकास कामे करावीत असे आवाहन करून ते म्हणाले की, जिल्हा परिषदची यंत्रणा असेल त्या प्रत्येक गावी संबंधित ग्रामसेवक व तलाठी या कर्मचाऱ्यांनी राहणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे शासनाच्या सर्व योजनांची माहिती या अधिकाऱ्यांना असणे आवश्यक असून जर ती त्यांच्याकडे नसेल तर त्यांनी त्या माहितीचा अभ्यास करून गावकऱ्यांना सर्व योजना माहीत होतील याची गांभीर्याने दखल घेऊन आपल्या स्तरावर माहिती कार्यशाळा आयोजित करावी असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मुख्य कर्तव्य असून अतिशय जबाबदारीने त्यांनी या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांनी किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामाशिवाय जिल्हा परिषद मुख्यालयात अजिबात येऊ नये. जर एखादी व्यक्ती विनाकारण बोलाविल्याशिवाय जिल्हा परिषदेकडे फिरल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर थेट कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.  आपण लोकांच्या कामासाठी आहोत याची जाणीव ठेवून बारकाईने अभ्यास करून ते काम केल्यानंतरच जनतेला देखील आपण अधिकारी जबाबदारीने काम करीत आहोत हे समजू शकेल.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close