Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

तोंडावर मास्क न लावणारयांवर दंडात्मक कारवाई करा :तहसीलदार संजय वारकड

कन्नड : तालुक्यात कोविड १९ नियंत्रण व प्रतिबंधक उपाय योजना व काटेकोर राबविण्यासाठी कन्नड तालुक्यातील आठ महसुली मंडळासाठी आठ पथके स्थापन करण्यात आली असून तोंडावर मास्क न लावणारया नागरीकांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी दैनिक लोकपत्रशी बोलताना सांगितले . पुढे बोलताना तहसीलदार संजय वारकड म्हणाले की मंडळ वाईज नेमलेल्या पथकांने त्यांचा मंडळा अंतर्गत येणाऱ्या मंगल कार्यालय , धार्मिक स्थळे , हाँटेल , गांवात भरत असलेला बाजार , कोचिंग क्लासेस यांना भेटी देऊन कोरोना संदर्भात अटीचे पालन होते किंवा नाही यांची चौकशी करावी . कोरोना संदर्भातील नियमाचे पालन होत नसेल तर संबंधिता विरुध्द आपती व्यवस्थापन कायदा २००५ गुन्हे दाखल करण्यात यावे .तसेच विना मास्क फिरणारया नागरीकांना ५०० रुपये दंड आकारणी करावी असे आदेश तहसीलदार संजय वारकड यांनी सर्व पथक प्रमुख यांना दिले आहेत . तालुक्यात नेमलेले पथक प्रमुख असे कन्नड मंडळ नायब तहसीलदार हरुण अजीज शेख ,पिशोर मंडळ स्वप्न्निल खुल्लम , देवगाव रंगारी मंडळ एम बी बारवाल ,चापानेर मंडळ वाय पी सकट ,चिकलठाण मंडळ दिनकर पाटील , करंजखेड मंडळ ए आर पाटील, नाचवेल मंडळ विलास जोशी , चिंचोली मंडळ आर डी बेडवाल असे पथक प्रमुख नेमणूक करण्यात आली असून यांना मदतीसाठी तलाठी , ग्रामसेवक , कृषी सहायक यांच्या ही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत .असे तहसीलदार वारकड यांनी सांगितले . नागरीकांनी घरातून बाहेर निघताना तोंडास मास्क बांधने आवश्यक असून गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये . बाहेर घरी आल्यावर हात स्वच्छ धुऊन घ्यावे विनाकारण नागरीकांनी गर्दी करु नये आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी व कोरोना हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी शासनास मदत करावी असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी यावेळी केले आहे.
Attachments area

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close