Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

कुंटुरचे सपोनि पठाण यांना तडकाफडकी निलंबित करा आमदार राजेश पवार यांचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र


नायगाव /शेषेराव कंधारे

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पठाण हे मनमानी कारभार चालवत या पोलिस ठाण्याच्या हद्दीत जातीय तेढ निर्माण करणे , खोट्या गुन्ह्यात नागरिकांना गोवणे, अवैध धंद्यांना पाठबळ देणे असे उद्योग चालत असल्याने कर्तव्यात कसूर करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र आमदार राजेश पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांना दिले आहे.
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाणे अलीकडच्या काळात भलतेच चर्चेत आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांच्या तुघलकी कारभाराने अक्षरशः या भागातील जनता त्रस्त झाली आहे . सर्वसामान्यांच्या हितासाठी असणारे पोलीस प्रशासन गुंडगिरी, वाळूमाफिया, मटकाकिंग यांची पाठराखण करत असल्याने सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . त्यामुळे कुंटुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांच्या विरोधात आता चक्क आ. राजेश पवार यांनी तक्रार केली आहे . तक्रारीत आ. राजेश पवार यांनी पठाण यांच्या काळया कारणाम्याचा पाढाच वाचला आहे. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये मटक्या सारखा अवैध धंदा चालविणाऱ्या माफियांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर वाळू माफियांना पाठीशी घालत आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात एखाद्या ठिकाणी वाद झाल्यास एका गटाला आपल्या हातात धरुन दुसर्‍या गटावर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडणे त्यानंतर दुसऱ्या गटाला चिथावणी देऊन पहिल्या गटा विरुद्ध गुन्हे दाखल करायला लावणे आणि दोन्ही गटाकडून व्यक्तींकडून माया गोळा करणे असा गोरखधंदा सुरू आहे . याशिवाय या परिसरात गुटका , मटका , अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून हातभट्टी विक्रीलाही उधाण आले आहे. विनापरवाना दारू विक्री होत असल्याने अनेक गावातील संसाराची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. ‘ ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय ‘ या बिरुदावलीला सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण अक्षरश : काळिमा फासत आहेत. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांची तडकाफडकी बदली नव्हे तर त्यांना तडकाफडकी निलंबित करावे अशी मागणी करणारे पत्र आमदार राजेश पवार यांनी नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे . या पत्रात जिल्हा अधीक्षक यांच्या कारभारावरही राजेश पवार यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांना पाठिशी न घालता त्यांच्यावर कारवाई करावी अशी अनेक वेळा आपल्याकडे मागणी केल्यानंतरही आपण पठाण विरुद्ध कारवाई का करत नाहीत असा सवालही आमदार राजेश पवार यांनी या पत्रात उपस्थित केला आहे. याअनुषंगाने विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्याची तयारी असल्याचे आमदार राजेश पवार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांच्या कामाची चौकशी करून त्यांना निलंबित करणार ? का आमदार राजेश पवार यांच्या पत्राला केराची टोपली दाखवणार हे येत्या काही दिवसांतच दिसून येणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close