Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

‘आरे’च्या सर्व स्टॉल्सचे सर्वेक्षण करा – दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनिल केदार


मुंबई : मुंबईत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी आरे स्टॉल्सचे वितरण करण्यात आले होते. काही स्टॉल्सवर सध्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री न होता इतर उपयोगासाठी स्टॉल्स वापरल्याचे निदर्शनास येत असल्याने सर्व स्टॉल्सचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनिल केदार यांनी दिले.

मंत्रालय येथे आरे स्टॉल्सचा आढावा घेण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त एच. पी. तुम्मोड उपस्थित होते.

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनिल केदार यांनी मुंबईत आरे स्टॉल्सवरून सद्यस्थितीत आरे उत्पादनाची होणारी स्टॉलनिहाय एकूण विक्री, दुग्धजन्य पदार्थ सोडून इतर पदार्थांची विक्री व त्याबाबतची माहिती, एकूण आरे स्टॉलची संख्या,सध्या प्रत्यक्ष चालवित असणारे व अवैधरित्या हस्तांतर करून चालविणाऱ्या आरे स्टॉल्सची संख्या अशी माहिती मिळवण्यासाठी तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close