Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मराठवाडा विभागाचे मुख्य आयुक्त सुनील केंद्रेकर असे गृहकर्तव्यदक्ष ‘कारभारी’


औरंगाबाद: आज (१६ जानेवारी) सकाळी सुनील केंद्रकर खुलताबाद येथे गेले असताना त्यांना बाजार दिसला आणि त्यांनी पत्नीसोबत बाजार केला. विशेष म्हणजे त्याच्यासोबत कोणताही सुरक्षारक्षक सुद्धा नव्हता. कुणाच्या खांद्यावर,कुणाचे ओझे’ असे गाणे आपण कधीतरी ऐकले असेल.म्हणजे आपले ओझे दुसऱ्याच्या खांद्यावर लादायचे असे काही जबाबदारीची चालढकल करणारे लोक असतात.काही म्हणण्यापेक्षा बरेच आणि बहुतेक.पण ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या नव्या म्हणीला पुरून उरणारेही काही गृहस्थ असतात.मराठवाडा विभागाचे मुख्य आयुक्त सुनील केंद्रेकर असे गृहकर्तव्यदक्ष ‘कारभारी’ठरले आहेत.झाले असे की ते आज अचानक आपल्या सौभाग्यवतींसह चक्क बाजारात भाजीपाला किराणा खरेदीसाठी गेले,आणि खरेदी केलेल्या बाजाराची पिशवी त्यांनी चक्क खांद्यावरुन वाहिली.एरवी आयएएस अधिकारी म्हटले की त्यांचा तोरा,ताठा,मोठेपणा,प्रोटोकॉल भलतेच असतात.आत्मप्रौढी,आणि इगो देखील असतात.पण सोबतचे छायाचित्र पाहिलेत तर ते कोणा बड्या आयएएस अधिकाऱ्याचे असेल यावर आपला विश्वास बसणार नाही,पण हे खरे आहे.छायाचित्रात दिसणारे खांद्यावर बाजाराची पिशवी घेतलेले व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून चक्क मराठवाडा विभागाचे मुख्य आयुक्त सुनील केंद्रेकर आहेत.बसला ना धक्का.आज (१६ जानेवारी) सकाळी सुनील केंद्रकर खुलताबाद येथे गेले असताना त्यांना बाजार दिसला आणि त्यांनी पत्नीसोबत बाजार केला. विशेष म्हणजे त्याच्यासोबत कोणताही सुरक्षारक्षक सुद्धा नव्हता.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close