Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

ताणतणाव व सर्वरोग निदानबाबत कळंब येथे शिबीर यशस्वी

ताणतणाव व सर्वरोग निदानबाबत कळंब येथे शिबीर यशस्वी

     उस्मानाबाद:-जिल्हा हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व येथील जिल्हा रुग्णालयाच्या प्रकल्प प्रेरणा कार्यक्रमाअंतर्गत कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात   मोफत ताणतणाव निवारण आणि सर्वरोग निदान आरोग्य शिबीर काल यशस्वीरीत्या पार पडले.    

         जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.जीवन वायदंडे, डॉ. शोभा वायदंडे, मनोविकार तज्ज्ञ  डॉ. महेश कानडे आणि डॉ.राजेश नरवाडे, डॉ.मंजूराणी शेळके तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सारंग रामढवे, डॉ. पुरुषोत्तम पाटील , डॉ.आवटे, डॉ. भालेराव,  डॉ. बिदरकर, डॉ. इम्रान शेख,डॉ. श्याम चौधरी, डॉ. विक्रांत राठोर (NTCP सल्लागार), नेत्रचिकित्सक श्री.साळुंके आदींनी रुग्णाची तपासणी करून मार्गदर्शन केले.यावेळी मनोविकार विभाग आणि जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत कर्मचारी  उपस्थित होते.

       यावेळी  प्रास्ताविकात मनोविकार टंडन तज्ज्ञ  डॉ.राजेश नरवाडे यांनी  कोविड 19 नंतर ब-याच लोकांमध्ये मानसिक आजार उदभवत असल्याचे दिसत येत आहेत. वेळीच  योग्य निदान करुन औषधोपचार केल्यास, असे रुग्ण नक्कीच बरे होऊ शकतात असे  सांगितले.  अध्यक्षीय भाषणात  वैदयकीय अधीक्षक डॉ.जीवन वायदंडे यांनी  अशा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना लाभ होईल तसेच ज्या लोकांना संशय घेणे, कानात आवाज ऐकू येणे, भास निर्माण होणे, सतत बडबड करणे, विचारांवर नियंत्रण न रहाणे, फिट्स  येणे, झोप न येणे आणि व्यसनी अशा समस्यांनी ग्रस्त लोकांनी अशा शिबिरांचा आवश्य लाभ ध्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी  केले.

             या शिबिरामध्ये  288 रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी इन्चार्ज सिस्टर श्रीमती सुनंदा गोस्वामी,तानाजी कदम,पांडुरंग शिंदे, विजयकुमार यादव,दत्तप्रसाद हेडडा,ईश्वर भोसले आणि उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close