Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

अभिनेता सुशांत सिंह “एम.एस. धोनी…” च्या शूटिंगसाठी तीन दिवस होता औरंगाबादेत..!

औरंगाबाद शहराची पडली होती भूरळ                   

औरंगाबाद/ विशेष प्रतिनिधी  MH20live

औरंगाबाद शहर पर्यटन नगरी आहे ,आता पर्यत सर्वच अभिनेत्याला ती आवडतच आली…त्यत तरुणाच ताईत आसलेला आवडा अभिनेता एम एस धोन्हीचा फँन याना आवडता सुशांत सिंह राजपूत पण औरंबाचा चहता बंनला होता.                          

प्रतिथयश अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (दि.१४ जून) मुंबईतील वांद्रे येथील आपल्या निवासस्थानी आत्महत्या केल्याच्या घटनेने औरंगाबादेत चित्रीकरण झालेल्या “एम. एस. धोनी अन्टोल्ड स्टोरी ” या चित्रपटाच्या काही आठवणी जागवल्या आहेत.                                           

  ३४ वर्षीय अभिनेत्याच्या आत्महत्येच्या घटनेने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली असून, औरंगाबादेतील त्याच्या चाहत्यांनी देखिल हळहळ व्यक्त केली आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मिडियांतून अभिनेता सुशांत सिंह राजपूत यास व्यथित अत:करणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.                                                                 0 २०१५ मध्ये शूटिंग                                         सिनेपत्रकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१५ मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या टीमसोबत “एम. एस.धोनी अन्टोल्ड स्टोरी” या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या निमित्ताने तब्बल तीन दिवस औरंगाबादेत तळ ठोकून होते. जालना रोडवरील हॉटेल रामा इंटरनॅशनल मध्ये ते थांबले होते. या काळात सलग तीन दिवस “एम. एस. धोनी अन्टोल्ड स्टोरी” या चित्रपटाचे बरेचसे चित्रिकरण पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात झाले होते. डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पायथ्याशी असलेली औरंगाबाद लेणी, बेगमपुर्यातील बीबी का मकबरा, मौलाना आझाद कॉलेज परिसर, हॉटेल ताज रेसिडेन्सी आदी ठिकाणी “धोनी”  चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण झालेले आहे. यावेळी अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. चित्रीकरण पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. यात तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय होती. अभिनेता सुशांतला प्रत्यक्ष पाहण्यासाठी मराठवाड्यातून तरुण आले होते. सुशांत सिंह राजपूत याच्या राजबिंड्या व्यक्तिमत्त्वामुळे त्याने तरुणाईला भूरळ घातली होती. त्यामुळे त्यास पाहण्यासाठी मौलाना आझाद काँलेज परिसरातील हाँटेल मँनेजमेंट परिसरात तरुणाईची तोबा गर्दी उसळली होती. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेकांची इच्छा असूनही आवडता अभिनेता सुशांतला कोणालाही भेटता न आल्याने सगळ्यांचा हिरमोड झाला होता, असे प्रा. डाँ. शाहेद शेख यांनी सांगितले.                 सुशांत सिंह राजपूत याला औरंगाबाद शहरात पत्रकार परिषद देखील घ्यावयाची होती, मात्र प्रचंड गर्दीमुळे घेता आली नाही.                                  २०१३ मध्ये सुशांत सिंह राजपूत याने ” काई पो चे”  सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. यानंतर “शुद्ध देसी रोमान्स” या सिनेमातही तो झळकला. पण, बॉलिवूडमध्ये त्याला खरी ओळख दिली ती “एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी” या सिनेमाने. या सिनेमात त्याने भारताचा माजी कर्णधार एस एम धोनी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर सुशांत “केदारनाथ” या सिनेमातही सारा अली खान सोबत दिसला होता. “सोन चिडिया”, “डिटेक्टिव्ह ब्योम्लेश बक्षी”, “छिछोरे” यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. सुशांतच्या एक्स मॅनेजर दिशा सलीने देखील ९ जून रोजी मालाडमध्ये चौदाव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. सुशांत सिंह राजपूत मूळचा मूळचा बिहारमधील पाटणा येथील रहिवासी होता. २१ जानेवारी १९८६ मध्ये त्याचा जन्म झाला होता. वडील सरकारी अधिकारी आहेत. त्याचे कुटुंब २००० मध्ये दिल्लीत स्थायिक झाले. प्राथमिक शिक्षण पाटणामध्ये सेंट करेंस हायस्कूलमध्ये आणि पुढील शिक्षण दिल्लीच्या कुलाची हंसराज माँडेल स्कूलमध्ये पूर्ण केले. दिल्लीमधील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती.                                                                 0 औरंगाबादची भूरळ….                                        औरंगाबाद महानगरात सलग तीन दिवस विविध ठिकाणी सुशांत सिंह राजपूत याच्यावर विविध प्रसंग चित्रित करण्यात आले होते. औरंगाबादच्या काही तंत्रज्ञांची त्याला यावेळी मदत झाली होती. औरंगाबाद शहराने आपणास भूरळ घातल्याची प्रतिक्रिया त्याने औरंगाबादच्या तंत्रद्न्यांकडे माध्यम प्रतिनिधी जवळ व्यक्त केली होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close