Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

ऑनलाइन अभ्यासामुळे होणार विद्यार्थ्यांचा फायदा

कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रकोप लक्षात घेता महाराष्ट्रात च नव्हे तर संपूर्ण देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आला.लॉक डाऊन मुळे सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी देण्यात आली.त्यामुळे प्राथमिक, उच्च प्राथमिक,माध्यमिक च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम काही प्रमाणात अपूर्ण राहिला,एवढेच नाही तर दुसऱ्या सत्राची अंतिम परीक्षा ही रद्द करण्यात आली.      विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे चीज व्हावे आणि विद्यार्थ्यांना उर्वरित अभ्यासक्रम घरीच राहून पूर्ण करता यावा यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक-पालक यांच्या सहयोगाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासाचे नियोजन करण्यात आले.
ऑनलाइन म्हणजे काय ?इंटरनेट च्या मदतीने केलेले कार्य,माहिती ची देवाण-घेवाण संगणक,अँड्रॉइड मोबाईल च्या माध्यमातून आपण प्राप्त करू शकतो.
ऑनलाइन अभ्यास करण्यासाठी लागणारी साधने/साहित्य :-
ई – बालभारती (www.ebalbharati.in ), (e balbharati App ) :-
विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आपल्या इयत्तेची पुस्तके ऑनलाइन प्राप्त करण्यासाठी ई बालभारती वेब पेज वरून प्राप्त करू शकतो. हे उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे.इयत्तेची पुस्तके आपल्या मोबाईल, संगणकावर सहज उपलब्ध होतील व अभ्यास करण्यात मदत होईल.
दीक्षा ऍप :-सर्वप्रथम आपण हे ऍप मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यावे,आपले नाव,शाळेचे नाव,इयत्ता,माध्यम इत्यादी प्राथमिक माहिती भरावी.लगेच आपल्या वर्गाची विषय वार अभ्यास, व्हिडिओ आपणास दिसतील व आपल्याला घरी बसून अभ्यास करता येईल.याने आपल्या अभ्यासाला गती देखील प्राप्त होईल.
शाळेचे वेब पेज किंवा ऍप :-
सर्व स्तरातील मानांकित संस्था, शाळा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी निरंतर प्रयत्न करत असतात. इयत्तेनुसार अभ्यासक्रम, कृतीयुक्त खेळ, शब्द खेळ, विविध शालेय अभ्यासक्रम व्हिडिओ लिंक्स,प्रश्न पेढी,ऑनलाइन घटक चाचण्या सतत वेब पेज /ऍप वर उपलब्ध करून देतात. याद्वारे विद्यार्थी घरी बसून आपला अभ्यास पूर्ण करू शकतात.
फेसबुक  लाईव्ह :-
शिक्षण क्षेत्रात ही सोशल मीडिया चा प्रभाव दिसून येत आहे.यापूर्वी विद्यार्थी वेगवेगळे कार्यक्रम फेसबुक लाईव्ह द्वारे पाहत होते आता विद्यार्थ्यांना आपले शिक्षक -शिक्षिका शाळेतील विषयवार नियोजनानुसार दररोज अभ्यासक्रमातील घटकावर मार्गदर्शन करतात, तत्पूर्वी सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येतात.
व्हाट्सएप :-
व्यक्तिगत संपर्काचे प्रभावी माध्यम. व्हाट्सएपचा उपयोग शैक्षणिक कार्यात लॉक डाउन च्या काळात अधिक वाढला आहे.सर्व अभ्यासक्रम,विषयवार नियोजन, अभ्यासक्रमाचे व्हिडिओ, हस्तलिखित साहित्य तसेच वेगवेगळ्या पी. डी. एफ. फाईल्स विद्यार्थ्यांना वर्गाच्या व्हाट्सएप ग्रुप वर पाठविण्यात येतात.याने अभ्यास करण्यासाठी मदत होत आहे.विद्यार्थी आपल्या शिक्षकांशी संभाषण करू शकतात आणि आपल्या अडचणी घरी बसून सोडवू शकतो.
ई – मेल :-वेब पेज किंवा ऍप वरून माहितीची देवाण-घेवाण करता येते.ई मेल चा उपयोग संदेश च्या स्वरूपात आपली अडचण सोडविण्यासाठी विद्यार्थी करू शकतो. लिखित माहिती,हस्तलिखित इमेज किंवा पीडीएफ फाईल्स द्वारे अभ्यासाला गती मिळेल.
यूट्यूब ऍप, लिंक्स,चॅनल :-
अगदी लहानात-लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रभाव कायम करणारे माध्यम यूट्यूब आहे.शिक्षण क्षेत्र मागे कसे राहणार.विद्यार्थ्यांना आपल्या विषयाच्या पाठानुसार अभ्यासाच्या व्हिडिओ क्लिप पहायला मिळतात. त्या क्लिप वारंवार पाहून विद्यार्थी आपला अभ्यास पूर्ण करू शकतो.शिक्षकांकडून स्वतः तयार केलेले व्हिडिओ ,अन्य शिक्षकांनी तयार केलेली व्हिडिओ लिंक्स विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर पाठविण्यात येतात व अलगदपणे विद्यार्थी एका क्लीक मध्ये अभ्यास करू शकतो.
आकाशवाणी / रेडियो :-
ध्वनिसंदेश वहनाचे प्रमुख स्रोत रेडियो. आकाशवाणी वर सतत इयत्तेच्या लेखमाला येत असतात.निश्चित वेळेत आपण रेडियो द्वारे ही आपला अभ्यास करू शकतो,आज इंटरनेट च्या सहाय्याने रेडियो चॅनल च्या माध्यमातून देखील अभ्यासात मदत होऊ शकते.
दूरदर्शन/ई विद्या वाहिनी :-
दूरदर्शन च्या वेगवेगळ्या चॅनल द्वारे अभ्यास करण्यास मदत होत आहे.D D National  वर ही आताच घोषणा झाली आहे की इयत्तेनुसार चॅनल तयार करण्यात येणार असून सर्व अभ्यास पूर्ण करता येणार आहे.तसेच अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आपण मेमरी कार्ड,पेन ड्राईव्ह मध्ये सेव करून देखील पाहून शकतो याने अभ्यासात मदत ही होते.
झूम ऍप :-
सामुदायिक दृकश्राव्य माध्यम आहे,हे नवीन माध्यम आहे,वेळ निश्चित केला जातो इयत्तेनुसार व आय डी व पासवर्ड आपण टाईप केल्यावर ठरलेला वर्ग,अभ्यास सुरू होतो.विषयांवर दिलेली व्याख्याने आपण पाहून देखील अभ्यासात मदत होत आहे.
ऑनलाइन टेस्ट :-
विद्यार्थी शिकत असलेल्या वर्गाच्या ऑनलाइन तयार केलेल्या घटक चाचण्या,शिकविल्या घटकावर,पाठावर विध्यार्थ्यांना पाठविण्यात येतात.चाचण्या विद्यार्थी सोडवतात व निकाल देखील स्वतः च पहायला मिळतो म्हणजेच अभ्यास किती झाला आहे,कसा करावा अभ्यास याची जाणीव होते.आज ज्या ऑनलाइन टेस्ट पहायला मिळतात त्या google forms, testmoz इत्यादि.
होणार फायदा ऑनलाइन अभ्यासाचा :-
केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण भागात ही शाळांमध्ये ऑनलाइन अभ्यासक्रमाची सुरुवात झाली आहे.विद्यार्थी तंत्रज्ञानाचा ही अधिक वापर करत आहेत आणि विज्ञान युगात आवश्यक ही आहे.नवनवीन माहिती विद्यार्थ्यांना मिळत असल्याने त्यांच्या ज्ञानात निरंतर वाढ होत आहे.शिकण्याची इच्छा देखील दृढ झाली आहे.ऑनलाइन अभ्यासाचा फायदा ही होत आहे.काळानुसार आवश्यक बाब झाली आहे ऑनलाइन अभ्यास.इंटरनेट ची सुरुवात 1969 पासून झाली.प्रारंभिक काळात इंटरनेट चा वापर खूप मर्यादित होता.उत्तरोत्तर संगणक,इंटरनेट चा वापर वाढत गेला.अँड्रॉइड मोबाईल ने संचार क्रांती वेगाने झाली,त्यातच शिक्षण क्षेत्र ही मागे नाही.आपल्या समोर वेगवेगळी साधने/माध्यमे ही जरी प्रभावी असली तरी कधी-कधी ऑनलाइन प्रक्रियेत अडचणी येतात. विद्यार्थ्यांनी लॉक डाउन च्या काळात उपलब्ध साधनांच्या सहाय्याने घरी बसून अभ्यास केला.अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न ही केले गेले.वेळेचे नियोजन शाळेकडून विद्यार्थ्यांना देण्यात आले होते.     लॉक डाऊन चा काळ हा घरबंदी नसून ती एक संधी आहे.याचा प्रत्यय ही दिसून आला.दिलेल्या वेळेत अभ्यास पोहचला नाही की विद्यार्थी लगेच आपल्या शिक्षकांना संपर्क करत होते याचा अनुभव मला देखील आला आहे.
एकंदरीत संचार क्रांती मुळे लॉकडाऊन च्या काळात ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात मदत झाली.निश्चित संख्या सांगता येत जरी नसली तरी 75 % एवढे विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासात सक्रिय दिसून आले.काही उणीवा ही आहेत,जशे लॉ डाऊन मुळे बरेच पालक स्थलांतरित झाले आहेत, कधी संपर्क माध्यम नसेल अशी विद्यार्थी वंचित दिसून आली आहेत.अश्या प्रसंगी सकारात्मक विचार देखील आपण केला पाहिजे. ऑनलाइन अभ्यासाच्या फायद्या सोबत,ऑनलाइन टेस्ट मुळे येणाऱ्या काळात ऑनलाइन परीक्षेला ही सामोरे जावे लागणार आहे.ही एक पूर्वतयारी च म्हणावी लागेल.आज आपण ज्या युगात आहोत त्या युगात संपर्क माध्यम अत्यंत उपयोगी आहे आणि इच्छा नसेल तरी ही आपल्याला युगा सोबत चालावे लागणार आहे.विध्यार्थ्यांनी लॉक डाऊन च्या काळात आपला वेळ अभ्यासासाठी दिला असल्याने ऑनलाइन अभ्यासाला फायदा झाला आहे.
(टिप..-सबधीत लेखाशी ,एम एच20लाईव्ह नेटवर्क, एम.एच20लाईव्ह , जबाबदार नाही, लेखकच जबदार आसेल. )

लेख लेखक:
श्याम नारायण रावलेमाध्यमिक शिक्षक, तज्ञ मार्गदर्शक.कै. दीनानाथ मंगेशकर मा. शाळा,सातेफळता.वसमत जिल्हा:हिंगोली9423947877
[email protected]

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close