Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

विद्यार्थ्यांनो, काळजी नको…मनपा करणार ‘डिजिटल शिक्षण प्रणाली’ चा अवलंब..!


‘झूम ॲप’ बैठकीत ठरले नियोजन

औरंगाबाद / mh20live

कोरोनामुळे एक पर्याय म्हणून महापालिकेने विटखेडा वॉर्डात नुकताच डिजिटल शिक्षण प्रणालीचा शुभारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर आता महापालिकेतील इतर सर्व शाळांत डिजिटल शिक्षण प्रणाली सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी महापालिकेचे सर्व केंद्रिय मुख्याध्यापक, समग्र शिक्षा अभियानचे ज्ञानदेव सांगळे  व शशिकांत उबाळे यांच्या उपस्थितीत ‘झूम ॲप’ वर गुरुवारी (दि.१८) बैठक झाली. या बैठकीत डिजिटल शिक्षण सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.

महापालिका शाळांमध्ये डिजिटल साहित्य कशा पद्धतीने बनवून ते पुरवता येईल. कोरोना संकटकाळात ऑनलाइन विद्यार्थ्यांचा अभ्यास कशा प्रकारे करून घेता येईल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसे पोहोचवता येईल, यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी ‘झूम ॲप’ वर ही बैठक घेण्यात आली. सुरुवातीला सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी विद्यार्थ्यांना नेमकं काय द्यायचं, विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचायचं यावर चर्चा केली. यानंतर शशिकांत उबाळे यांनी या उपक्रमाची सर्व माहिती विस्तृतपणे मांडली. महापालिका शाळेत काम करणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकांपैकी स्वत:हून अनेक तंत्रस्नेही शिक्षक या उपक्रमात जोडले गेले आहेत. त्यात तुषार ताठे, गणेश निंबाळकर, दिनेश म्हस्के, मोहिनी बर्डे, तेजस्विनी देसले, मनोज अग्रवाल, अश्विनी हिवर्डे, गायत्री जाधव, हेमंत पांगारकर, अभिजित पवार, सीमा पोद्दार, विद्युल्लता पवार, विजयश्री कन्नर, विनोद वटणे, तिलोत्तमा वहाटुळे, ज्योतिबाला पवार, मंगल शिंदे आदी शिक्षक एकत्र येऊन साहित्य तयार करण्याचे काम करत आहेत. या ऑनलाईन बैठकीत सांस्कृतिक अधिकारी सोनार, सर्व शिक्षा अभियानाचे ज्ञानेश्वर सांगळे, मुख्याध्यापक मंगला एलकटवाड, हेमलता भुयार, उर्मिला लोहार, संगीता ताजवे, रफिक शेख, विजय कोल्हे आदींनी सहभाग नोंदवला, अशी माहिती सोनार यांनी दिली.

० ‘व्हाटस्ॲप’ वर वर्गनिहाय अभ्यासक्रम !

डिजिटल शिक्षणासाठी तयार केलेले ई-साहित्य महापालिकेतील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रीय मुख्याध्यापक व मुख्याध्यापक यांच्या मदतीने संपूर्ण महापालिकेतील विद्यार्थ्यांच्या वर्गनिहाय व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केले जाणार आहे. या ग्रुपवर दररोज हे तंत्रस्नेही शिक्षक वर्गनिहाय त्या-त्या वर्गाचा अभ्यासक्रम त्याची लिंक टाकतील. जेणेकरून या कोरोनामुळे शाळा बंद काळातदेखील विद्यार्थ्यांचा अभ्यास मागे पडणार नाही. उर्दू शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांना आवाहन करून याचप्रकारे उर्दू शाळांचेही नियोजन करण्यात येणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close