Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा ; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा:भिलवंडे


नायगाव ता./शेषेराव कंधारे
 शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीनच्या पिकासाठी “ईगल,जानकी,ग्रीनगोल्ड,महामंडळ, संजय सिड्स,हिरामोती, या कंपनीच्या बियाणे खरेदी करून पिरणी केली.परंतु बहुतांशी पेरलेले बियाणे शेतात उगवलेचं नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक  थांबवून सर्व संबंधीत दुकानदार आणि विक्रेते कंपनीवर ताबडतोब गुन्हा दाखल करा व शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी कृषी अधिकारी काळे व नायगावाचे नायप तहसीलदार वगवाड यांच्याकडे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भिलवंडे यांनी निवेदनद्वारे केली आहे.
       सदरील निवेदन प्रसंगी नायगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भिलवंडे,श्याम चौंडे, गजनान पाटील पवार,सुशील पवार,माधवराव कोरे,संदीप कल्याण, माधवराव बेंद्रीकर,माधव पांडे आदी उपस्थित होते.
      खरीप हंगाम दरम्यान शेतकऱ्यांनी नेहमीच काबाडकष्ट करूनही केलेला खर्च नेहमीच निघाणे अवघड झाले असून कधी बळीराजाला निसर्गाचा फटका तर कधी हमीभावचा फटका यातून हतबल झालेल्या शेतकऱ्यांना विकत घेतलेले खत बियाणे खरेदी करून सोयाबीनची पेरणी केल्यानंतर जेव्हा पीक उगवताच नाही म्हणून बोगस बियाणेमुळे शेतकऱ्यांची चौहीकडून कोंडी होत आहे.
प्रथमच नायगाव तालुक्यात दिवसान दिवस तक्रारीचा पाऊस पडत असून जेथे कृषी दुकान तेथे  शेतकऱ्यांची तक्रार असे चित्र देखील निर्माण झाले आहे.त्या अनुषंगाने झालेले नुकसान भरपाई  मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आक्रोश निवेदन दिले असून संबंधीत दुकानदार व या बोगस कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार कृषीअधिकारी आणि तहसील प्रशासनाकडे यांच्याकडे भिलवंडे यांनी एका निवेदनद्वारे नमूद केले आहे

दोषी दुकानदारवर कारवाई होणारच -कृषी अधिकारी काळे

नायगाव तालुक्यात जवळपास साडे सहाशेहून अधिक तक्रारी कृषी विभागाकडे प्रथमच प्राप्त झाले असून विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगविलेच नाही हे देखील मान्य करून अहवाल प्राप्त होताच दोषीं दुकानदारवर कारवाई करू असे भिलवंडे यांना कृषी अधिकारी काळे यांनी सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close