Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

एसटीएल ने केले स्थानिक समुदायाला सहकार्य, औरंगाबाद जिल्ह्यात केला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन च्या ६ टँकर्सचा पुरवठा

एसटीएल ने केले स्थानिक समुदायाला सहकार्य, औरंगाबाद जिल्ह्यात केला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन च्या ६ टँकर्सचा पुरवठा

औरंगाबाद, २०२१-  कोविड-१९ महामारीच्या दुसर्‍या लाटेचा सामना संपूर्ण देश करत असतांनाच एकीकडे आरोग्य सेवाप्रदाता गरजू आणि आजारी लोकांना मदत करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.  सातत्याने वाढत्या कोविड-१९ रूग्णांच्या संख्येमुळे भारतीय आरोग्य सुविधांवर यामुळे मोठा  ताण आला आहे,  या सर्व  परिस्थिती मुळे वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि उपकरणांवर ही मोठा  ताण येऊ लागला आहे.  या सर्व गोष्टींमुळेच यावर्षी आपल्याला रेमडिसीव्हीर, व्हेंटिलेटर्स, आयसीयू बेड् आणि ऑक्सिजन सिलेंडर्स ची टंचाई जाणवू लागली आहे. 

हे आव्हान ओळखून एसटीएल (एनएसई:एसटीएलईटेक), या बाजारपेठेतील आघाडीच्या डिजिटल नेटवर्क्स चे एकत्रिकरण करणार्‍या  कंपनी ने स्थानिक समुदायाला तसेच सरकारला  सहकार्य करण्यासाठी एक पाऊल टाकले आहे.  आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या परवानग्या आणि मान्यता प्राप्त केल्यानंतर एसटीएलकडून औरंगाबाद जिल्ह्यातील रूग्णालयांकरता लिक्विड मेडिकल ऑक्सिजन ची खरेदी करून  त्यांचा पुरवठा  करण्यात येणारआहे.  यामुळे आता जिल्ह्यातील ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण होण्यास  मदत होणार आहे.  या उपक्रमाचा  एक भाग म्हणून एसटीएल प्लान्ट्स कडून १०० मे टन क्षमतेच्या  मे‍डिकल ऑक्सिजनचे  ६  टँकर्स देण्यात येणार असून यांतील २ टँकर्स म्हणजेच  ३२  टन ऑक्सिजन हा जिल्हा कलेक्टर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.  त्याचबरोबर एसटीएल स्थानिक आरोग्य प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी  ऑक्सिजनच्या आपात्कालीन साठवणूकीचीही सुविधा  निर्माण केली आहे.  त्याशिवाय ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊन तो अखंडीतपणे  उपलब्ध  करून देण्यासाठी तसेच  त्यांची योग्य देखभाल व्हावी यासाठी औरंगाबाद येथील हॉस्पिटल्स बरोबर काम करण्यासाठी तज्ञ ही उपलब्ध  करून दिले आहेत.   

यावेळी आपले मत व्यक्त करतांना एसटीएलच्या कनेक्टिव्हिटी सोल्युशन्सचे सीईओ अंकित अगरवाल यांनी सांगितले “ गेल्या वर्षाच्या  तुलनेत या वर्षी आरोग्याची स्थिती खूपच वाईट आहे. अशा कठीण  काळात आपण  या महामारीच्या दुसर्‍या  लाटेचा सामना करत आहोत.  या काळात विविध वयोगटांत हा आजार पसरत आहे.  त्याच बरोबर लसीकरणाची प्रक्रिया ही पहिल्या टप्प्यात आहे.    सरकार आणि ऑक्सिजन उत्पादक हे ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतांना एसटीएल मध्ये आंम्हाला असे वाटते की सरकार आणि वैद्यकीय क्षेत्रातील योध्दांना सहकार्य करून कोविड-१९ शी लढा देण्यात सहकार्य करावे.  औरंगाबाद मधील एक सकारात्मक व्यावसायिक आणि  सामाजिक काम करणारे म्हणून एसटीएल ने नेहमीच सर्वांचे भले करण्यावर भर दिला आहे आणि आम्ही हे सातत्याने करत राहू.  साठवणूक आणि देखभाल करून मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करणाच्या  आमच्या उपक्रमाच्या माध्यमातून आंम्हाला  अशी आशा आहे की अशा कठीण काळात आम्ही लोकांचे जीवन वाचवून  त्यांच्या जीवनाला  मुल्य प्रदान करू शकू.”

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close