Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत मनसेचे औरंगाबाद विभाग नियंत्रकांना निवेदन

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औरंगाबाद विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. यामध्ये माहे जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकत्रित वेतन, शासन निर्णयानुसार कोविड19 भत्ता ताबडतोब वाटप करण्यात यावा, स्मार्ट सिटी अंतर्गत कर्तव्य केलेल्या सर्व कामगारांना स्मार्ट सिटी भत्ता अदा करण्यात यावा. पात्र चालकांना ऑफ कॅन्सल चे पैसे अदा करण्यात यावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद MH20LIVE NETWORK

राज्यभरात कोरोनाचा संसर्ग असल्याने लॉकडाऊन च्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एसटीचे औरंगाबाद विभाग नियंत्रक यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या. मनसेच्या वतीने विभाग नियंत्रकांना देण्यात आलेल्या निवेदनात बदली झालेल्या कामगारांना त्वरित सोडण्यात यावे, आपल्या विभागात एसटी व एसटी कामगारांच्या अनेक समस्या निर्माण होत असून त्याचा एसटीच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होत असून एस्टी कामगार समस्याग्रस्त झाले आहेत, आपल्या विभागात मध्यम व लांब पल्ल्याच्या गाड्या कमी प्रमाणात सुरू आहेत त्यांची संख्याचालनीय गरजेनुसार वाढवण्यात यावी. मुख्य मार्गावरील फेऱ्या कमी असल्यामुळे चालक ,वाहकांना नियोजित कामगिरी मिळत नाही ती देण्यात यावी, वैद्यकीय दृष्टया अपात्र झालेल्या एस्टी कर्मचार्यांना रा.प. परिपत्रकानुसार पर्यायी कामगिरी देण्यात यावी, कोरोना महामारी अद्याप संपली नाही त्याकरिता कामगारांच्या आरोग्य संरक्षणार्थ वैद्यकीय चिकित्सा व उपचार नियमित सुरू ठेवावेत, महिला वाहकांना विशेषतः बाहेर गावाहून येणाऱ्या महिला वाहकांना योग्य कामगिरी देण्याचे नियोजन करावे, बाहेरगावच्या महिला वाहकांना जाण्या-येण्याच्या सोयीनुसार कामगिरी देण्यात यावी, प्रत्येक आगारातील बस येतांना व जातांना निर्जंतुक करूनच मार्गस्थ करावी , चालक ,वाहक, वाहतूक नियंत्रक यांना दैनंदिन मास्कचा पुरवठा करण्यात यावा, कोरोना बाधित एस्टी कामगारांशी दुजाभाव न करता त्यांच्या उपचाराची योग्य व्यवस्था करण्यात यावी व प्रशासनाकडून आर्थिक मदत करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. वरील सर्व मुद्द्यांचे तात्काळ नियोजन करून कार्यवाही व्हावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.

औरंगाबाद विभाग नियंत्रकांना देण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, मराठवाडा अध्यक्ष अशोक पवार पाटील, मराठवाडा सचिव संदीप जाधव, जिल्हाध्यक्ष उमेश दीक्षित, विभागीय अध्यक्ष एन डी दिनोरिया, विभागीय कार्याध्यक्ष एन जे वैजापूरकर, विभागीय सचिव सतीश लक्कस, कोषाध्यक्ष रविंद्र शिरसाठ, वि. संघटक गणेश जाधव, महिला संघटक मीरा चव्हाण, वि. उपाध्यक्ष उदय कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुख गणेश गीते यांच्यासह मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close