Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

वार्षिक सवलत कार्ड योजना सुरु करा. महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेची मागणी.

वार्षिक सवलत कार्ड योजना सुरु करा.
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेची मागणी.
कोरोना महामारी मुळे आर्थिक संकटात आलेली एस.टी.व एस.टी.कामगार अत्यंत अडचणीत आले असतांना ऊत्पन्नवाढीचे पर्याय एस.टी.ला शोधणे गरजेचे आहे.एस.टी.कडून पुर्वी वार्षिक सवलत कार्ड हि प्रवाशांच्या पसंतीस पडलेली सवलत योजना होती ती बंद पडलेली आहे .ती पुन्हा सुरु करण्यात यावी.या सवलत योजनेत वार्षिक २००रुपये भरुन कार्ड मिळत असे त्यावर प्रवाशांना प्रवासभाड्यात १०%एवढी सुट मिळत असुन १लाख५०हजाराचा विमा लागु होत होता ही योजना सुरु करुन सवलत कार्डाचे वार्षिक मुल्य ५००रुपये करुन योजना कार्यान्वित केल्यास एस.टी.व प्रवाशी या दोन्हींचा फायदा या योजनेतुन होईल करीता दिवाळीपुर्वी हि योजना सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेने ने केली असुन ऊत्पन्नवाढीचा व प्रवाशी वाढीचा मार्ग सुचवला आहे. सदर योजना लागु करण्यासाठी म.न.रा.प.का.सेना सर्वोतोपरी सहाय्य करेल अशीआग्रही मागणी केली असल्याचे म.न.रा.प.का.सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी माळी.महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, प्रदेश सचिव प्रदिप गायकी, मराठवाडा अध्यक्ष अशोक पवार पाटील व सचिव संदीप जाधव यानी दिली आहे.
सदर योजना सुरु झाल्यास जिल्हाभरात सहकार्य करणार असल्याचे मत म.न.से.परिवहन जिल्हा अध्यक्ष उमेश दिक्षित, विभागीय अध्यक्ष एन. डी. दिनोरिया, कार्याध्यक्ष नीरज वैजापूरकर, सचिव सतीश लक्कस पाटील, रविंद्र शिरसाठ, गणेश जाधव, मीरा चव्हाण, उदय कुलकर्णी, गणेश साठे यांनी व्यक्त केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close