Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

अटकळीत मुलाने केला जन्मदात्या बापाचा खुन

बिलोली तालुक्यातील आटकळी येथील थरार घटना

mh20live Newtorwk

नरसीफाटा / शेषेराव कंधारे
सतत दारू पिऊन घरातील सर्व सदस्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देणाऱ्या बापाचा चक्क मुलानेच धारदार चाकूने भोसकुन टाकून हत्या केल्याचा थरार घटना बिलोली तालुक्यातील अटकळी येथे दि.२६ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली असुन या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रामतीर्थ पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलोली तालुक्यातील आटकळी गावालगतच घर बांधून असलेल्या मारुती पिराजी रघुपती वय वर्ष ४० याला दारूचे व्यसन होते. दारुसाठी घरातील सर्व सदस्यांना तो नेहमी मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता.दि. 26 मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मारुती पिराजी रघुपती हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला होता. दारू पिल्यानंतर घरी त्याने मुलाशी व पत्नीशी वाद घातला होता तु दारू पिऊन गोंधळ का करत आहेस म्हणून शुल्लक कारना वरून आपल्या जन्मदात्या बापाच्या अंगावर धारधार चाकुने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याने रक्तच्या थारोळ्यात पडल्याने त्यांचा यात दुर्दैवी मूत्यु झाला हि घटना रामतीर्थ पोलीसांना समजताच सपोनि सोमनाथ शिंदे यांनी आपल्या पोलिस कर्मचार्यासह घटनास्थळी भेट देऊन सदरील घटनेचा रितसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवले असता शवविच्छेदन करून दि.२७ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता हा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने अटकळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी मयताची पत्नी आणी आरोपीची आई असलेल्या पार्बतबाई मारोती रघुपती यांनी दिलेल्या रितसर फिर्यादी वरून भुमाजी मारोती रघुपती वय 20 वर्षे यांच्या विरुद्ध गुरन 88/2020 कलम 302 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केले असून या घटनेचा पुढिल तपास सपोनि सोमनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close