Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पदवीधर मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा खासगी आस्थापनांनी वेळेची सुट देण्याचे आवाहन

औरंगाबाद: महाराष्ट्र शासन निर्णयानुसार दिनांक 01 डिसेंबर , 2020 मंगळवार रोजी होणाऱ्या 05 – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2020 निवडणुकीसाठी पदवीधर मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमितिक रजेव्यतिरिक्त असणार आहे, असेही ते म्हणाले.
भारत निवडणूक आयोग यांचे दिनांक 02 नोव्हेंबर , 2020 रोजीचे प्रसिध्दी पत्रकानुसार 05 – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक -2020 निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान दिनांक 01 डिसेंबर , 2020 (मंगळवार) रोजी सकाळी 08.00 ते सायंकाळी 05.00 पर्यंत होणार आहे. महाराष्ट्र शासन , सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार सदर निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करणेबाबत निर्देश दिलेले आहेत, असेही त्यांनी कळवले आहे
जिल्ह्यातील खासगी आस्थापना, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपुरती सवलत द्यावी. वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर योग्य त्या सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close