Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

दिलखुलास’कार्यक्रमात विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव

दिलखुलास’कार्यक्रमात विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव

         मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सायबर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची ‘सायबर सुरक्षा जबाबदारी सर्वांची’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार  दि.15, बुधवार दि. 16 आणि गुरुवार  दि.17 डिसेंबर रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

          कोरोना काळात वाढलेले सायबर गुन्हे, सोशल मीडियावर टाकल्या जाणा-या चुकीच्या पोस्ट, ऑनलाईन खरेदी करताना होणारी फसवणूक, ऑनलाईन पेमेंट ॲप व त्यासंदर्भात घ्यावयाची काळजी, फेसबुकवर येणा-या चुकीच्या पोस्ट, ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आदी विषयांची माहिती श्री. यादव यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close