Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

आजचं बोला, संजय राऊतांचा फडणवीसांना सणसणीत टोला

मुंबई : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदवरून (Bharat Band) महाविकास आघाडी (maha vikas aghadi government) विरुद्ध भाजप (BJP) असा वाद पेटला आहे. ‘जर उत्खनन करण्याचे ठरवले तर खूप लांब जाता येईल, आज शेतकरी का रस्त्यावर उतरला त्यावर बोला’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना फटकारून काढले.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भारत बंदला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘हा भारत बंद राजकीय नाही. हा बंद शेतकऱ्यांच्या भावनांना पाठिंबा देण्यासाठी आहे. ज्याच्या कष्टाचे अन्न आपण खातोय, त्याला पाठिंबा देण्यासाठी हा बंद आहे. त्यामुळे आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिले पाहिजे. शेतकऱ्यांना पाठिंबा देणे हा फक्त देशातल्या नाही तर जगातल्या नागरिकांचं कर्तव्य आहे’, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे एपीएमसीबद्दलचे जुने पत्र वाचून दाखवत जोरदार पलटवार केला होता. याबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ‘आता जर उत्खनन करायचे म्हटलं तर खूप लांबपर्यंत जाता येईल. 10 वर्षांपूर्वीचे बोलू नका. शेतकरी आज रस्त्यावर आहे. ‘शेतकऱ्यांनो, रस्त्यावर या’ असं आवाहन शिवसेना, राष्ट्रवादी आणि तृणमृल काँग्रेसने केले नाही. जो शेतकरी रस्त्यावर उतरला त्याला कुणाचेही पाठबळ नाही. कोणताही राजकीय पक्ष त्यांच्याबाजूने उभा नाही, शेतकऱ्यांच्या हातात कोणताही राजकीय झेंडा नाही. त्यामुळे विरोधी पक्षाने हे नीट समजून घेतले पाहिजे. आपण विरोधी पक्षनेते म्हणून काय भूमिका घेतोय याचा त्यांनी 10 वेळा विचार केला पाहिजे’ असा सणसणीत टोला राऊत यांनी लगावला.

तसंच, ‘आज शेतकरी छातीवर गोळी खाण्यासाठी का उभा आहे, याचा जर शांत डोक्याने विचार केला तर मला खात्री आहे, देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतील’ असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

‘केंद्र सरकार जर मनापासून काम करत असेल तर कोणत्याही दबावाची गरज नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. हा देश शेतकऱ्यांचा असेल तर त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे’, असंही राऊत म्हणाले.

लोकसभेत जेव्हा कृषी विधेयक सादर करण्यात आले होते. त्यावेली आम्ही पाठिंबा दिला नव्हता, असंही राऊत म्हणाले.

‘शरद पवार राष्ट्रपतींना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतील. राष्ट्रपतींना अधिकार असतील तर ते प्रश्न सोडवतील. शिवसेनेच्या नेत्यांना दिल्लीत जाऊन कोणाला भेटायची गरज नाही, शरद पवार भेटत आहेत, ते महाराष्ट्राचीच भूमिका मांडतील’ असंही राऊत म्हणाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close