Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

सोयगाव: फेसबुक अकाउंट हॅक करून पैश्याची अफरातफर करणाऱ्या विरुद्ध पोलिसात तक्रार

सोयगाव,दि.१४ विजय पगारे मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे पाटील यांचे sopan gavhande patil हे फेसबुक अकाउंट अज्ञात व्यक्तीने (हॅक) काबीज करून मला पैशांची अत्यंत आवश्यकता असल्याचा मेसेज पाठवून ९६६९७७२८३० या नंबर वर फोन पे करण्याचे आवाहन केले होते. फेसबुक अकाउंट हॅक करून पैश्याची अफरातफर करणाऱ्या विरुद्ध मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे पाटील पोलिसात तक्रार केली आहे.या आवाहणास खरे समजून मराठा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे पाटील यांच्या निकट वर्तीय नातलग व मित्रांनी गुगल पे द्वारे ९६६९७७२८३० वर १० हजार,५ हजार अश्या रकमा पाठविल्या होत्या. रक्कम पाठविल्या बद्दल सोपान गव्हांडे यांना मेसेज व फोन करून पैसे मिळाले का याची खात्री केली असता सोपान पाटील यांनी पैसे का पाठविले असे विचारणा केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सोपान पाटील यांनी सोयगाव पोलीस स्टेशन गाठून सहाययक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांना भेटून फेसबुक हॅकर अज्ञात ईसमाविरुध्द तक्रार नोंदविली आहे.
फेसबुक हॅकर अज्ञात इसमा बाबत सायबर विभाग पोलीस औरंगाबाद यांचे कडे तक्रार पाठविण्यात आली असून त्या आधारावर सायबर विभाग तपास करीत आहे. — स. पो. सुदाम शिरसाठ पोलीस स्टेशन सोयगाव

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close