Subscribe to our Newsletter
Loading
निसर्ग चक्रीवादळ

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत खार प्रतिबंधक बंधारा सक्षमीकरणाच्या कामाचे लवकरच भूमीपूजन

अलिबाग,जि.रायगड,दि.10 :– राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले आणि अलिबाग तालुक्यातील काचली- पिटकारी येथील खार प्रतिबंधक बंधाऱ्याचे सक्षमीकरण करण्याचे कामासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजुरी मिळाली आहे.
खारभूमी विकास मंडळ ठाणे, जलसंपदा विभागाकडून ही कामे करण्यात येणार आहेत. पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले आणि अलिबाग तालुक्यातील काचली-पिटकारी येथील खार प्रतिबंधक बंधाऱ्याचे सक्षमीकरण करण्याच्या कामास पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांनी मंत्रालय स्तरावर संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग आणि संबंधित विभाग प्रमुखांच्या बैठका घेतल्या होत्या.
त्यानुसार शासनाने पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले आणि अलिबाग तालुक्यातील काचली- पिटकारी येथील खार प्रतिबंधक बंधाऱ्यांचे सक्षमीकरण करण्याच्या कामास अनुक्रमे रु. 44 कोटी 40 लाख 37 हजार 689 व रु. 10 कोटी 82 लाख 20 हजार 626 रक्कमेस सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.
त्यानुषंगाने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पेण व अलिबाग तालुक्यातील दोन्ही खार प्रतिबंधक बंधाऱ्याच्या सक्षमीकरणाच्या कामांबाबतचे कार्यारंभ आदेश दिले असून लवकरच या कामाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे.या खार प्रतिबंधक बंधाऱ्याच्या सक्षमीकरणामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close