Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

प्रत्येक मातेने पाळावेत असे बाळांच्या स्वच्छतेचे काही नियम

लहान बाळांची रोगप्रतिकारशक्ती संपूर्णपणे विकसित झालेली नसल्याने त्यांना जंतूसंसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच, पालकांनी दक्ष राहिले पाहिजे आणि संसर्ग होण्यास कारणीभूत ठरणारे जंतू आणि बॅक्टेरिया यांच्यापासून आपल्या लहानग्यांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. बाळांची शरीरस्वच्छता पाळण्याच्या संदर्भात नवमातांशी संवाद साधताना हिमालय ड्रग कंपनीच्या आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. प्रतिभा बाबशेट सांगतात, ”बाळाची स्वच्छता राखल्याने ते रोजच्या रोज त्यांच्या संपर्कात येणा-या जंतू व विषाणूंमुळे ते आजारी पडण्याची शक्यता कमी होण्यास मदत होते. तेव्हा, आपल्या बाळाच्या सुरक्षेचे जतन करण्यासाठी पालकांनी चांगल्याप्रकारे स्वच्छता राखायला हवी. मातांनी हे विशेषत्वाने ध्यानात ठेवायला हवे, कारण बाळ दिवसातील बहुतांश वेळ त्यांच्याकडेच असते.”

आपले हात नियमितपणे स्वच्छ धुण्याचा सल्लाही त्या देतात, कारण साधी सर्दी, फ्लू आणि इतर संसर्गांना कारणीभूत ठरणारे जंतू आणि बॅक्टेरिया हातावर असतात. ”हानीकारक बॅक्टेरिया आणि जंतू नष्ट करण्यासाठी आपले हात पाणी आणि साबणाने कमीत-कमी २० सेकंद व्यवस्थित धुणे अतिशय गरजेचे आहे. बाळाला खाऊ देण्याआधी, त्याचे नॅपी बदलल्यानंतर, पाळीव प्राण्याला किंवा कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर आपले हात धुवा. थोड्या खेळत्या वयातल्या आपल्या मुलांनाही हात धुण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे.” डॉ. प्रतिभा पुढे सांगतात.

लहान मुलं खेळताना किंवा रांगताना घरातील जवळ-जवळ प्रत्येक पृष्ठभागाच्या संपर्कात येत असतात. म्हणूनच घरातील पृष्ठभाग जंतूनाशकांनी स्वच्छ करण्याचे काम आठवणीने करायला हवे. आंघोळ हासुद्धा शरीरस्वच्छतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ”आपल्या बाळाला स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यासाठी त्याला चांगली आंघोळ घालणे गरजेचे आहे. आपल्या मुलांसाठी वापरत असलेले आंघोळीचे टॉवेल दर ३-४ महिन्यांनी जरूर बदला. मातेनेही स्वच्छतेचे काही प्राथमिक नियम पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे रोगजंतू मातेकडून बाळाकडे संक्रमित होणार नाहीत.”डॉ. प्रतिभा सांगतात.

दैनंदिन कामे करत असताना स्वच्छता जपण्याचे महत्त्वही डॉ. प्रतिभा अधोरेखित करतात. बाळाचे डायपर दर २-३ तासांनी बदलायला हवे व बाळाचा पार्श्वभाग स्वच्छ करायला हवा किंवा पुसून काढायला हवा, बाळाचे कपडे नियमितपणे आणि मोठ्यांच्या कपड्यांपासून अलग करून धुतले पाहिजेत असा सल्ला त्या नवमातांना देतात. कारण सगळे कपडे एकत्र धुतल्यास मोठ्यांच्या कपड्यांवरचे जंतू बाळांच्या कपड्यांवर संक्रमित होऊ शकतात.” बाळांचे कपडे चांगल्याप्रकारे, हळुवारपणे स्वच्छ करणा-या, नैसर्गिक घटकांपासून बनलेल्या, जंतूनाशक गुणधर्म असलेल्या वनौषधींचा वापर असलेल्या आणि फॉस्फरस, पॅराबेन्सरहित, SLS/SLES/ ALS, कृत्रिम रंग, अतिरिक्त ब्लीच आणि सिलिकेट्समुक्त अशा एखाद्या बेबी लाँड्री डिटर्जंटचा पर्याय माता निवडू शकतात.” डॉ. प्रतिभा सांगतात.

पालकांनी आपल्या दिनचर्येमध्ये स्वच्छतेच्या या सर्व सवयी अंतर्भूत कराव्यात अशी शिफारस त्या करतात कारण त्यामुळे त्यांना ते आपल्या बाळाला स्वच्छ आणि जंतूविरहित वातावरणात वाढवू शकतील. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close