Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

घनकचरा प्रक्रिया केंद्र’ शहराच्या स्वच्छतेसाठी पुरक :पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद, दिनांक 16: शहरातील कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्नशील होते. त्या पार्श्वभूमीवर घनकचरा प्रक्रिया केंद्र औरंगाबादकरांच्या सेवेत दाखल होत असल्याने शहराच्या स्वच्छतेला तो पुरक ठरेल असे, पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री श्री. सुभाष देसाई यांनी आज येथे सांगितले.
पडेगाव येथे घनकचरा प्रक्रिया (150 मे. टन) केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, माजी खा. चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विनोद घोसाळकर, रेणुकादास वैद्य, महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, शहरातील सन 2052 पर्यंत पाणी योजनेचे नियोजन मुख्यमंत्र्यांनी केले असून याकरिता 1680 कोटी रुपयाच्या निधीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी येणार असल्याचे सांगून श्री. देसाई यांनी नागरिकांनी घरातील कचरा रस्त्यावर येऊ न देण्याची जबाबदारी पार पाडावी आणि विघटन होणारा ओला कचरा मनपाच्या घंटागाडीत जमा करावा, असे आवाहन देखील यावेळी पालकमंत्र्यांनी केले.
सुरुवातीला पडेगाव येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी प्रकल्पाची पाहणी देखील केली.
घनकचरा व्यवस्थापनासाठी शहरात चिकलठाणा (150 मे. टन), पडेगाव (150 मे. टन) , नारेगाव (150 मे. टन) येथे कचऱ्यावर प्रक्रिया केंद्राचे काम पुर्णत्वास असून पडेगाव येथे प्रक्रिया शेड, प्लॅटफॉर्म, संरक्षण भिंत, लिचडटँक, ऑफीस इमारत इत्यादी कामे पुर्ण झाली आहे. पडेगाव येथे घनकचरा प्रक्रिया बाबतची मशिनरी बसविण्यात आली असल्याची माहिती महानगर पालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय प्रास्ताविकात दिली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close