Subscribe to our Newsletter
क्राईम

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शीतल यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यापूर्वी शीतल यांची प्राणज्योत मालवली

शीतल आमटे आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला.

या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा वाद सुरु असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आलं. विषाचं इंजेक्शन घेतल्याचं लक्षात येताच त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close