Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी वेंटिलेटर्स आणि पीपीई किट्ससाठी उभारला १.२ कोटींहून अधिक निधी

औरंगाबाद/mh20live

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाने एक कोटी रुपयांची मदत याअधीच केली आहे. आता त्याचबरोबरीने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुणे आणि औरंगाबाद मधील कामगार संघटनांच्या साथीने एक दिवसाचा पगार देऊ करत १.२ कोटींहून अधिक निधी उभारला आहे. या निधीमधून मुंबई, पुणे आणि औरंगाबादमधील कोविड -१९ हॉस्पिटल्ससाठी १५ सर्व सुविधा असलेले वेंटिलेटर्स, १५ मॉनिटर्स आणि ३७५० पीपीई किट्स पुरवल्या जाणार आहे.

त्याचप्रमाणे कंपनीतर्फेन खेड आणि भोसरी गावातील गरजू कुटुंबांना २१ टन कोरडे धान्य आणि ससून रुग्णालयाला २२.३४ लाख मूल्याची आवश्यक औषधे दान करण्यात आली आहेत.
एसएव्हीडब्ल्यूआयपीएलतर्फे सातत्याने चाकण आणि औरंगाबाद येथील कारखाने आणि इंजिनीअर्सच्या कौशल्यांचा वापर करून पुनर्वापरयोग्य फेस शिल्ड बनवले जात आहेत. औरंगाबाद, बीड, लातूर आणि पुण्यातील हॉस्पिटल्स आणि आरोग्यकर्मचाऱ्यांना या कंपनीतर्फे १२००० फेस शिल्ड पुरवण्यात आले आहेत. इतकेच नाही, एसएव्हीडब्ल्यूआयपीएलचे इंजिनीअर्स जगभरातील तज्ज्ञांच्या साह्याने कन्टिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर उपकरण, ऑटोमॅटिक एमबीयू बॅग  , इन्ट्युबेशन बॉक्सेस आणि रेट्रो फिटेड फिल्टर्ड ऑक्सिजन मास्क्स अशा उपकरणांची निर्मिती करून कोविड -१९ रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना साह्य करत आहे.
याआधी एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने पुण्यातील ससून जनरल हॉस्पिटलमध्ये खास कोविड -१९ साठी ११०० खाटांची सुविधा उभारण्यात आर्थिक साह्य दिले आहे. कोविड -१९ ची लागण झालेल्या रुग्णांना आणि वैद्यकीय टीमला आवश्यक वैद्यकीय साधने आणि अत्यावश्यक सामुग्री पुरवण्याचाही यात समावेश होता, या ग्रूपतर्फे पुणे, औरंगाबाद आणि मुंबईतील रुग्णालयांमध्ये ३५,००० हून अधिक सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले आहे तसेच औरंगाबाद परिसरात ५०००० हून अधिक अन्नाची पाकिटे वाटण्यात आली आहेत. त्यांच्या मालकीच्या गाड्यांचा ताफा औषधे पुरवणाऱ्या संस्था, पालिका आणि स्वयंसेवकांसाठी देऊ करण्यात आल्या आहेत.
या सीएसआर उपक्रमासोबतच एसएव्हीडब्ल्यूआयपीएलतर्फे आपल्या ब्रँड्सच्या माध्यमातून सुरक्षित अंतर राखणे, होम आयसोलेशन आणि लॉकडाऊनच्या काळात गाड्यात सुरक्षित ठेवण्यासाठीच्या टिप्स दिल्या जात आहेत. स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन आणि ऑडीतर्फे या लॉकडाऊनच्या काळात वॉरंटी संपणाऱ्या गाड्यांसाठी अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आली आहे. लॅम्बोर्गिनी आणि पोर्शेने आपल्या सोशल मिडीयावरील प्रेक्षकांसाठी आकर्षक मोहीम राबवली आहे. कंपनीतर्फे देशाच्या विविध भागांमध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी सॅनिटायझेशन मोहीम राबवण्यात येत आहे आणि अत्यावश्यक सेवेत काम करण्यासाठी त्यांनी आपली सर्विसिंग सेवा देऊ केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close