Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

स्कोडा सुपर्ब: अत्याधुनिक, मोहक आणि आरामदायी

स्कोडा सुपर्ब: अत्याधुनिक, मोहक आणि आरामदायी

मुंबई: स्कोडा ऑटो इंडियाने सुधारित सुपर्ब श्रेणीचे अनावरण केले- नवी स्पोर्टलाईन आणि नवी लॉरीन अँड क्लेमंट आता अनुक्रमे रुपये 31.99 लाख आणि रुपये 34.99 लाख  (भारतीय मूल्य) अशा आकर्षक एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे.  2004 मध्ये सुरू करण्यात आलेली स्कोडा सुपर्ब ही भारतातील आरामदायी लिमोझीन दर्जा अधोरेखित करते.  नवी रचना, उत्कृष्ट अंतर्गत सजावट, सर्वोत्तम गुणवत्तेची सुरक्षितता आणि अतुलनीय मूल्य असणारी सुधारित स्कोडा सुपर्ब गुणवत्तेचे सर्वोत्तम निकष नव्याने मांडत आहेत.  

स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर श्री. झॅक होलीस म्हणाले, “स्कोडा सुपर्बला सुरुवात  झाल्यापासूनच  या विभागात तिने नवे गुणवत्ता निकष तयार केले आहेत.  आकर्षक रचना, आरामदायी अंतर्गत सजावट, भरपूर जागा आणि वेगळेपण या लक्षवेधी संयोगामुळे भारतातील ‘ऐशोआरामाचे मूल्य’ जाणणाऱ्या अनेकांसाठी ही एक आवडती जागा ठरली आहे.  सुधारित स्कोडा सुपर्बमध्ये काही आधुनिक अद्यतने केली असल्याने तिचा मोहकपणा वाढेल आणि सर्वांकडूनच तिचे कौतुकच होईल.”  

नवे लवचिक एलईडी हेडलॅम्प कक्ष 

सुधारित स्कोडा सुपर्बमध्ये रचना आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा सर्वसमावेशक परिणाम साधल्याने अतिशय सहजपणे तिचा दर्जा उंचावला आहे.  टोकदार आणि निमुळते नवे हेडलाईट्स हे रेडीएटर ग्रीलमध्ये सामावले गेले आहेत.  दिवसभर सुरू राहणारे एलईडी लाईट्स, प्रकशित आयलॅशेस आणि कमिंग/लिव्हिंग होम तंत्र तसेच एलईडी इंडिकेटर्स अशा अद्ययावत बाबींनी ही कार सुसज्ज आहे.    

सुधारित स्कोडा सुपर्ब ही स्टेट ऑफ आर्ट लवचिक फ्रंट-लाईटिंग प्रणालीने सुसज्ज असल्याने रस्ता आणि सभोवतालीचा परिसर आवश्यक तितका प्रकाशमान होतो.  परिवर्तनशील आकारामुळे नवे हेडलॅम्प गतीमधील, प्रकाशामधील आणि हवामानविषयक फरकातील बदलांना प्रतिसाद देतात.  यात उपलब्ध असलेल्या मोड्समध्ये सिटी, इंटर-सिटी, मोटारवे आणि रेन यांचा समावेश आहे.  एएफएस प्रणालीमुळे हेडलॅम्प गोलाकार आणि खाली वळू शकतात तसेच त्यात लवचिक हेडलॅम्प झुकाव नियंत्रण देखील आहे.  

पुढील फॉग लाईट्सच्या आकारामुळे स्कोडा सुपर्बचे सौंदर्य खुलून उठते.  वाहनाच्या समोरील भाग उजळण्यासाठी आणि विशेष करून कमी प्रकाश असलेल्या परिस्थितीत हे चार एलईडी फॉग लाईट्स जास्त प्रकाशित होतात.  

नवी मध्यवर्ती इन्फोटमेन्ट प्रणाली आणि वायरलेस चार्जिंग 

सुधारित स्कोडा सुपर्बमध्ये जवळील सेन्सरसह नवा 20.32 सेमी फ्लोटिंग कपॅसिटीव्ह टच डिस्प्ले आहे.  ही काचेची रचना आहे आणि त्यात अद्ययावत वापरकर्ता इंटरफेस दिला गेला आहे.  न्यू जनरेशन अमंडसन इन्फोटमेन्ट प्रणालीचा हा एक भाग आहे.  नॅव्हिगेशन सुविधेने सुसज्ज अशी ही रचना झेक ऑटोमोटिव्ह उत्पादकांनी विकसित केली आहे.   

सुधारित स्कोडा सुपर्ब स्मार्टलिंक (SmartLink™) तंत्रज्ञानाने युक्त आहे.- स्कोडा कनेक्टीव्हिटी ही  मिररलिंक (MirrorLink™) ला आणि वायरलेस कारप्ले तसेच अॅन्ड्रॉईड ऑटोला सहाय्यभूत ठरून स्मार्टफोनची अखंड कनेक्टीव्हिटी आणि विनाअडथळ्याचा प्रवास देऊ करते.  ती आवाजी आदेशावर नियंत्रित होते.  नवे ‘टाईप सी’ युएसबी पोर्ट्स आणि ब्ल्यूटूथ (Bluetooth®) जीएसएम टेलिफोनी तसेच ऑडीओ स्ट्रीमिंग पर्याय यात आहेत.  वायरलेस चार्जिंग पॅडवर स्मार्टफोनचे तोंड वरच्या दिशेने ठेवल्यास, मोबाईल उपकरणाचा आपोआप संपर्क होतो आणि त्याला विजेचा पुरवठा होतो- अतिशय कल्पक तंत्र! 

नवी स्टेअरिंग व्हील रचना आणि आभासी कॉकपीट

सुधारित स्कोडा सुपर्बची अंतर्गत रचना ही तुमचे लाड करण्याच्या हेतूनेच तयार करण्यात आली आहे.  पिआनो ब्लॅक डेकॉरने आणि स्टोन बेज किंवा कॉफी ब्राऊन पर्फोरेटेड चामड्याच्या सजावटीने सुपर्ब लॉरीन अँड क्लेमंटच्या सौंदर्यात भर घातली आहे.  शोभिवंत वस्तू काळ्या रंगात असल्याने त्या क्रोम हायलाईट्सवर उठून दिसतात.  लॉरीन अँड क्लेमंट शब्द कोरलेल्या क्रांतिकारी दोन स्पोक स्टेअरिंग व्हील रचनेमुळे सुधारित स्कोडा सुपर्ब प्रथमच आपले वेगळेपण सिद्ध करत आहे.  

कार्बन डेकॉर, नव्या तीन स्पोकसह सपाट तळ असणारे सुपरस्पोर्ट बहुविधकाम करणारे स्टेअरिंग व्हील आणि पॅडल शिफ्ट तसेच स्पोर्टलाईन असे कोरलेले शब्द आणि एकसंध हेडरेस्ट असणाऱ्या काळ्या अल्कॅन्टरा (Alcantara®) स्पोर्ट्स सीट्स यामुळे सुधारित स्कोडा सुपर्ब स्पोर्टलाईनच्या देखणेपणात भर पडली आहे.   

सुधारित स्कोडा सुपर्ब, ही स्वत:च एक निकष ठरली असून आभासी कॉकपीट हे त्याचे वैशिष्ट्य आहे.  वैयक्तिक गरजेनुसार बदलता येणाऱ्या डिजिटल इन्स्ट्रुमेन्ट पॅनलमुळे व्यापक ड्रायव्हिंग डेटा आणि नेव्हिगेशनमध्ये एक नवे चैतन्य जाणवते.  

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close