Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेसकरिअर

स्कोडा तर्फे मेकॅट्रॉनिक्समधील ड्युअल ट्रेनिंग प्रोग्रामच्या9व्या बॅचच्या अर्जांचे आवाहन


औरंगाबाद  : स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (ŠAVWIPL), सादर करत आहेत मेकॅट्रॉनिक्स 2020 उपक्रम. या उच्च पातळीवरील संवादी आणि शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षण घेतलेल्या तसेच कमी कौशल्यांच्या कामातून विस्थापित झालेल्यांना नव्या युगातील कौशल्ये आत्मसात करून ऑटो क्षेत्रासाठी पूर्णपणे सज्ज होता येईल. हा अभ्यासक्रम आणि परीक्षा पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यासाठी या कंपनीने इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्ससोबत भागीदारी केली आहे. तसेच, ऑल इंडिया ट्रेड टेस्ट घेण्यासाठी नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगसोबतही भागीदारी करण्यात आली आहे. ऑटो क्षेत्रातील रोजगाराच्या आकर्षक संधींचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि व्यावसायिकांना अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या साडेतीन वर्षांच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षणार्थींना मेकॅट्रॉनिक्स क्षेत्रातील कौशल्ये शिकवली जातील. यात मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना ŠAVWIPL मध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन सक्षम केले जाईल.  त्यातून त्यांना उत्पादन, देखभाल, प्लॅनिंग, क्वॉलिटी अशुअरन्स तसेच संशोधन आणि विकास या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव आणि कामाचे ज्ञान मिळू शकेल. त्याचप्रमाणे, विशेष ट्रेड स्कूल्समध्ये वर्गातील पुस्तकी अभ्यासक्रम आणि प्रोजेक्ट असाइनमेंटचाही समावेश यात असेल. हे प्रशिक्षणार्थी ŠAVWIPL प्रमाणित प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा 70 टक्के वेळ प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी घालवतील तर 30 टक्के वेळ वर्गातील अभ्यासासाठी असेल.

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या एचआर् अॅण्ड अॅडमिनचे कार्यकारी संचालक श्री. जॅन फ्रायड्राय्च म्हणाले, “उत्पादन प्रक्रियेतील गुंतागुंत लक्षात घेऊन खास प्रकारे या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. सध्या उत्पादन प्रक्रियेत मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेटिक्स अशा विविध विषयांसोबत इतर आधुनिक ऑटोमेशन तंत्रज्ञानातील सखोल ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. या कार्यक्रमामुळे प्रशिक्षणार्थींना वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक गरजांनुरुप आवश्यक कौशल्यांनी सज्ज करता येईल, याची आम्हाला खात्री आहे.”

मेकॅट्रॉनिक्स 2020 प्रोग्राम हा ŠAVW च्या आधुनिक तंत्रज्ञानाचावापर करणाऱ्याअनोख्या प्रशिक्षण पद्धतींवर आधारित आहे. प्रतिभावान मनुष्यबळाला कौशल्ये शिकवणे आणि ती वृद्धिंगत करणे यासाठी मार्गदर्शनासह देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या जर्मनीतील ड्युअल-ट्रॅक व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रमावर हा कार्यक्रम आधारलेला आहे. या उपक्रमातून प्रशिक्षणार्थींना जर्मनी, चीन आणि ब्राझीलसारख्या इतर देशांमध्ये काम करण्याचीही संधी मिळते.

या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट 2020 आणि 23 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाइन अॅप्टिट्यूड टेस्ट/स्किल टेस्ट घेण्यात येईल.

मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्ससाठीची पात्रता :

सामान्य उमेदवारांसाठी 2019 किंवा 2020 मध्ये गणित आणि विज्ञान या विषयात किमान 70 टक्के मार्कांसहएसएस्सी. (दहावी) उत्तीर्ण

अनूसुचित जाती/जमातीतील उमेदवारांसाठी विज्ञान आणि गणित यात प्रत्येकी किमान 60 टक्के गुण

मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्ससाठी वयोमर्यादा  :

1 जून 2020 रोजी 17 वर्षांहून कमी वय असलेले उमेदवार (1 जून 2003 च्या आधी किंवा त्या तारखेस जन्मलेले)

अनूसुचित जाती/जमातीसाठी ही वयोमर्यादा 19 वर्षांपर्यंतची आहे (1 जून 2000 च्या आधी किंवा त्या तारखेस जन्मलेले).

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close