Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

औरंगाबाद :सख्या बहिण भावाची चुलत भाऊ, मेहुण्याने केली हत्या

औरंगाबाद: बहीण-भावाच्या निर्घृण हत्येने शहराला हादरवून टाकले होते. या हत्येमागील रहस्य उलगडले असून घरात ठेवलेल्या किलोभर सोन्यासाठी चुलत भाऊ आणि त्याच्या मेहूण्यानेच ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले. गुन्हेशाखेच्या पथकाने दोन्ही आरोपिना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला माल पोलिसांनी जप्त केला आहे. सतीश काळूराम खंदाडे (रा.पाचन वडगाव), अर्जुन देवचंद राजपूत (रा.वैजापूर,) असे अटकेतील दोघांची नावे आहेत. अटकेतील आरोपी सतीश हा मयताचा चुलत भाऊ आहे तर अर्जुन हा त्याचा मेहुणा आहे. या बाबत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी माहिती दिली.त्यांच्याकडून सोने व रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. हे हत्याकांड संपत्तीच्या कारणावरून, भाऊबंदकीतून उद्भवले असावे असा अंदाज आहे.
या दुहेरी हत्याकांडाचे प्रकरण समोर आल्यापासून या संदर्भात खंदाडे-राजपूत कुटुंबियांच्या नातेवाईकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले होते. ज्या पद्धतीने खून झाले ते पाहता यामागे कुणीतरी ओळखीचे असावे या निष्कर्षाप्रत पोलिस घटना पाहता क्षणी आले होते. तपासाची संपूर्ण दिशा नातेवाईकांकडे ठेवण्यात आली होती. हे हत्याकांड रात्री 8.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आले. दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास मयत किरण खंदाडे हिने आपल्या आईला फोन केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून हे हत्याकांड दुपारी 2 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान झाले असावे असा अंदाज व्यक्‍त केला जात होता.
या प्रकरणी साविस्तर माहिती अशी की, सातारा परिसरातील एमआयटी कॅम्पसच्या समोर कनकोरबेन नगरात लालचंद खंदाडे 2017 पासून भाड्याच्या बंगल्यात पत्नी, दोन मुली व एक मुलासह राहतात. खंदाडे यांची पत्नी एलआयसीची विमा प्रतिनिधी आहे.
हे कुटुंब मुळचे जालना जिल्ह्यातील पाचन वडगाव येथील आहे. तेथे त्यांची बर्‍यापैकी शेती असून त्यांची गणना श्रीमंत शेतकर्‍यांत होते. ते बहुतेक वेळा पाचन वडगाव येथेच राहतात. तोच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबादेत बंगला भाड्याने घेतल्याचे सांगण्यात येते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close