Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

सिल्लोड पोलिसांची धमाकेदार कारवाई ; चोरटी दारू व सव्वा दोन लाखांच्या मुद्देमलाह एकास अटक


सिल्लोड / विशाल जाधव (दि.२६)  –  सिल्लोड शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे यांच्यासह त्यांचे सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडाकेबाज कारवाई करून एकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे, पोलीस अंमलदार रामानंद बुधवंत, कृष्णा दुबाले, तुकाराम टारपे, राजेंद्र वरपे, सतुके सिल्लोड शहरात पेट्रोलिंग करत असताना यांना गोपनीय माहिती मिळाली एक इसम देशी दारूची अवैध विक्री करण्यासाठी त्याच्या ताब्यातील टाटा विस्टा क्रमांक एम एच २१ – व्ही ५४१४ या कारमध्ये देशी दारूचे बॉक्स घेऊन जात आहे. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा लावला असता औरंगाबाद नाका येथे भोकरदन नाका कडून सिल्लोड बायपासने विस्टा गाडी येताना दिसली सदरची गाडी हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडीच्या चालकाने गाडी न थांबवता त्याचे ताब्यातील गाडी भवन रोडणे पळून जात असता सदरच्या गाडीचा मोटारसायकलने पाठलाग करून भवन गावाजवळ गाडी पकडून गाडीतील विलास ताटे वय ३४ वर्ष राहणार गेवराई सेमी या इसमास ताब्यात घेतले आहे.
गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये देशी दारू भिंगरी कंपनीच्या १८० एम एल ई-मेलच्या २५ बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये ४८ बाटल्या प्रमाणे एकूण बाराशे बाटल्या प्रती बॉटल किंमत ५२ रुपयेप्रमाणे एकूण ६२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडे कोणताही वाहतुकीचा परवाना अगर दारू बाळगण्याचा परवाना नसताना स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता चोरटी विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगून वाहतूक करत असताना मिळून आला आहे. त्याचे कब्जात एक इंडिका विस्टा गाडी क्रमांक एम एच २१ – व्ही ५४१४ जुनी वापरती किंमत १ लाख ६० हजार रुपये व रुपये ६२ हजार चारशे रुपये किमतीची भिंगरी संत्रा नावाची देशी दारू असा एकूण २ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्या विरोधात पोलीस नाईक तुकाराम टारपे यांचे तक्रारीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र वरपे हे करत आहेत.
सिल्लोड पोलिसांची सदरील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे व पोनी राजेेंद्र बोकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे यांच्या नियंत्रणात पोलीस अंमलदार रामानंद बुधवंत, कृष्णा दुबाले, तुकाराम टारपे, राजेंद्र वरपे, चालक सतुके यांनी केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close