पदवीधर निवडणुकीत सिध्देश्वर मुंडे चा योग “सिध्द” होणार ?

आठ जिल्हे शाहात्तर तालुके पिंजुन काढणारा ढाण्यावाघची महाराष्ट्राच्या विरिष्ठ सभागृहात एंन्ट्री होणार?
परळी वै /समीर इनामदार
आपल्या कुशल बुध्दी कौशल्य व भाषण शैलीच्या वक्रत्वाने वयाच्या 27 व्यावर्षी संगणक परिचाक संघटनेचा संबंध महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांनी मागिल काही दिवसातच महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे रस्त्यावर अंदोलन करत मुंबई मुंडे नी मुंबई जाम केले. ऐवढेच नाही तर नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात 25 हजार तरुणांना एकञ करून दिवस राञ अंदोलन केले.तत्कालीन निष्टूर सरकार मागण्या मान्य करत नाही म्हणून युवक चिडून उठले व अंदोलन पेटले पोलीस व संगणक परिचाक यांच्यात बाचा बाची झाली त्यावेळी याच सिध्देश्वर मुंडे यांनी अंगावर लाट्या काट्या घेतल्या ऐवढी होऊन सुध्दा अंदोलन सोडून हा युवक विलाजासाठी रुग्णालयात गेला नाही जागीच बसून राहीलेला महाराष्ट्राने पाहीला. स्वतःला कसलेही आर्थिक पाठबळ नाही सामान्य कुटूंबातील तुमच्या आमच्या सारखा दैनंदिन मोटार सायकलवर फिरणार अगदी तुमच्या आमच्या रोज बसणार उठणारा युवक पाहता पाहता औरंगाबाद पदवीधर निवडणूक लढविण्यासाठी राजकीय मैदानावर उतरल तो या निवडणुकीत एकटा नव्हता त्यांने जो संघटने सोबत प्रमाणिक पणा केला लाठ्या काठ्या खाल्या ते महाराष्ट्रातील सर्व युवक या निवडनुकीत उतरे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातुन प्रत्येकजन आपल्या मिञाला आमदार करण्यासाठी कामाला लागला होता.सुरुवातीला जन्म भुमी असलेल्या परळी तालुक्यातील युवकांनी आपल्या कष्टाचा पैसा जमा करून 4 लक्ष रुपये वर्गणी दिली व तेथून खरी पदवीधर निवडणूकिच्या प्रचाराची सुरुवात झाली. ग्राम दैवत व प्रभू वैद्यनाथ,छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब,पात्रुड येथील दर्ग्यास चादर अर्पण करून दर्शन घेऊन मोठ्या ताफ्याने औरंगाबाद पदवीधर निवडणूकीसाठी उमेदवार अर्ज दाखल केला.सर्वांना वाटले राजकीय दबाव येईल व मुंडे आपला उमेदवार अर्ज मागे घेईल पण सिध्देश्वर मुंडे दबाव घेणाऱ्या पैकी नाही असा ठाम विश्वास युवकांना होता.अखेर उमेदवारी अर्ज कायम राहीला आणी पायाला भिंगरी बांधल्या प्रमाणे हा युवक मराठवाडा पिंजत होता आठ जिल्हे व शहात्तर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी सिध्देश्वर चे जंगी स्वागत होत होते गावा गावात युवक सिध्देश्वर मंडेला मतदान करा म्हणून मतदाराच्या दारोदारी जात होते. सिध्देश्वर या युवकाच्या प्रचारासाठी जनू एक मोहीमच उभा राहीली की काय असी चर्चा राजकीय वर्तुळात चालू झाली राजकीय पक्षानी उमेदवारी सहज घेतलेली सिध्देश्वर ची उमेदवार आता काळजाचे ठोके वाढवत होती.भल्या भल्यांना शक्य होणार नाही आशा सर्वाधिक व्यापक अशा मतदार संघात परळीचा मुंडे आपले नेतृत्व फैलावत होता. भाषण शैलीने मुंडे मतदारांना आकर्षित करत होता. ठिकठिकाणी मुंडेना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी मतदार जमत होते. वयाच्या 31 व्या वर्षी थेट पदवीधर निवडणूक लढवणारा या ढाण्या वाघाचा योग या निवडणुकीत पदवीधर मतदार नक्कीच “सिध्द” करतील व हा एक नविन मुंडे महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहात अवघ्या काही दिवसात एंन्ट्री करेल व एका नविन मुंडेला संबंध महाराष्ट्र पाहत राहील?