Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादमहाराष्ट्र

श्याम टरके यांना पीएच.डी पदवी जाहीर


 वेब वृत्तपत्रांचा केला तुलनात्मक अभ्यास

औरंगाबाद, दिनांक 30 : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विषयातील पीएच.डी पदवी श्याम बालासाहेब टरके यांना जाहीर झाली. त्यांचा ‘हिंदी व मराठी वेब वृत्तपत्रांचा तुलनात्मक अभ्यास’ हा शोध प्रबंध विद्यापीठाने स्वीकारला.
या प्रबंधात राष्ट्रीय पातळीवरील बीबीसी हिंदी, तहलका हिंदी तर प्रादेशिक स्तरावरील उस्मानाबाद लाईव्ह आणि आज लातूर या वेब वृत्तपत्रांचा त्यांनी तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. त्यांना मार्गदर्शक म्हणून महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रोफेसर डॉ. सुधीर गव्हाणे व सहमार्गदर्शक म्हणून नांदेड विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक तथा विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. दीपक शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक तथा जनसंपर्क तज्ज्ञ व हैद्राबाद येथील हिंदी प्रचार सभेचे परीक्षा मंत्री सुरेश पुरी यांनी अभिनंदन केले आहे.
श्री. टरके यांनी यापूर्वी दै.गोदातीर समाचार, दै.मराठवाडा साथी, दै. सकाळ आणि गोवा येथे दै. पुढारीमध्ये उपसंपादक, बातमीदार म्हणून काम केलेले आहे. शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वर्धा जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालय व नागपूर संचालक कार्यालय येथे माहिती सहायक पदावरही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते औरंगाबादच्या माहिती केंद्रात माहिती सहायक पदावर कार्यरत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close