Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानः पहिल्याच दिवशी 16000 कुटूंबांशी संपर्क


शहरातील विविध भागांतून शोभायात्रा, महिनाभर होणार निधी संकलन

संभाजीनगरः राम मंदिर निर्माणासाठी अधिकाधिक रामभक्तांचे योगदान व्हावे यासाठी संभाजीनगर शहर निधी समर्पण समितीच्या वतीने श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान राबविण्यात येत असून शुक्रवार(ता.15 जानेवारी)पासून या अभियानाला सुरवात झाली आहे. या अभियानाची सुरूवात शहरात विविध ठिकाणी दिमाखदार शोभायात्रांसह, पथनाट्ये सादर करून करण्यात आली. मकरसंक्रांतीपासून एक महिन्यात हे निधी संकलन अभियान राबविण्यात येणार आहे
 शहरात २५ ठिकाणी ढोल ताशे भजनांसह दिमाखदार शोभायात्रा काढण्यात आल्या. त्यानंतर संतांच्या ऊपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन होऊन निधी संकलनाला सुरुवात झाली. या अभियानाला पहिल्याच दिवसापासून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून अनेकांनी निधी संकलनासाठी पुढाकार घेतला आहे. पहिल्याच दिवशी 16000 कुटूंबांशी संपर्क साधण्यात आला.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने केलेल्या आवाहनानुसार शुक्रवारपासून रामभक्त घराघरात जाऊन निधी संकलन करणार आहेत. अभियानासाठी जिल्हा पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रत्येकी एक कार्यकर्ता किमान वीस घरे असे 15 हजार कार्यकर्ते तीन लाख घरांशी संपर्क साधणार आहेत. या अंतर्गत 190 वस्त्या असून 885 उपवस्त्या आहेत.
शहरात विविध ठिकाणी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत लहान मुला मुलींनी सहभाग नोंदवत रामायण काळातील देखावे सादर केले. अनेक मुले लव कुश यांच्या वेशभुषेत सहभागी झाले होते. भाजीविक्रेते, दुकानदार यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवत निधी समर्पण केले. शोभायात्रेत रामभक्तांनी विविध पथनाट्ये सादर केली. साईनगर एन – ६ येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत २५० महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला होता.

या कार्यक्रमात विविध भागांतील ४००० रामभक्त, पू. संत, जेष्ठ नागरीक, महिला, लहान मुले सहभागी झाली. त्यांनी १६००० कुटुंबाशी संपर्क करुन निधी संकलन केले.
या कार्यक्रमात ह.भ.प. नवनाथ महाराज आंधळे यांच्यासह निधी संकलन समितीचे सुशिल भारुका, अतुल काळे, राजीव जहागिरदार, पंकज भारसाखळे, दिपाली अनसिंगकर, शैलेश पत्की, पंकज पाडळकर ऊपस्थित होते. या अभियानात केवळ निधीच नाही, तर रामभक्तांनी त्यांचा वेळही द्यावा असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
—-

86 वर्षीय आजींनी समर्पित केला 1,00,100 चा निधी
शहरात श्रीराम मंदिर निधी समर्पनाची सुरवात गारखेडा येथील 86 वर्षीय आजी श्रीमती उषा पुराणकर यांच्या पासुन झाली. या अभियानाची शहरातील सुरवात आपल्यापासून व्हावी अशी त्यांची ईच्छा होती. त्यासाठी त्यांनी सकाळी ९ वाजता 1,00,100 रूपये निधी समर्पित केला. उषाताई यांनी सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम न करता श्रीराम  मंदिरासाठी निधी समर्पित केला. त्या १९८६ साली आयोध्येला गेल्या होत्या. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close