Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

धक्कादायक: कन्नड – बेलखेडयांत दोनशे कोबंडयांचा अचानक मृत्यू



पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल

कुक्कुटपालन धारकांना शासकीय मदतीची गरज

कन्नड : बेलखेडा येथील तरुण व बेरोजगार डीग्रीधारक शेतकरी कुंजीलाल ईश्वर चव्हाण याने शेतीला जोडधंदा व घरात मदत म्हणून काही करावे म्हणून मोठ्या जोमाने त्याने आपल्या भोपेवाडी शिवारातील धनगरवाडी गावाजवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोरील गट क्रमांक पाच मधील शेतात कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला होता यासाठी या तरुण शेतकऱ्याने शेड तयार करण्यासाठी 80 हजार रुपये खर्च करून त्यामध्ये क्रॉस गावरान जातीचे 250 कोंबडीचे पिल्ले व त्यांचे खाद्यपदार्थ तसेच खाद्यपदार्थ खाण्याचे भांडे तीन महिन्या पूर्वी विकत आणले होते. त्यासाठी हया शेतकऱ्यांने 70 हजार रुपये खर्च करून हया कोंबड्याना वाढीस लावले होते यासाठी सर्व खर्च जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च केला होता परंतु रात्री तो शेतकरी नऊ वाजता चारा आणि पाणी यांचे भांडे भरून आला व सकाळी शेतात जाऊन पाहतो तर अंदाजे दोनशे कोंबड्या मरण पावलेल्याअवस्थेत सकाळी शेतकऱ्यांला दिसल्या ते पाहून तो घाबरून गेला. नंतर त्याने मित्र व नातेवाईक यांना फोन करून घडलेली घटना सांगितली मेलेल्या कोंबड्या पाहण्यासाठी बेलखे डा ,बेल खेडा तांडा, धनगरवाडी, भोपेवाडी, ना गद तांडा, येथील ग्रामस्थांनी खूपच गर्दी केली होती. नंतर पशू वैद्यकीय अधिकारी ,ग्रामसेवक, तलाठी यांना सदरील घटनेची माहिती दिली. नागद येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. सुरसुंद्रे एम.एस. यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली व वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली. दुपारी तीन वाजेपर्यंत डॉ.सुरेखा माने पशू संवर्धन अधिकारी जिल्हापरिषद औरंगाबाद यांच्या सह डॉ.आर डी इंगळे,पशुधन विकास अधिकारी कन्नड(विस्तार), डॉ. पी वाय चौधरी पशुधन विकास अधिकारी नागद ,डॉ. गांधीले ,डॉ. नीळकंठ वार, डॉ. सुसुंद्रे, यांनी भेट दिली. मेलेल्या कोंबड्या ची पाहणी केली.डॉ. सुरेखा माने यांनी या वेळी सांगितले की मृत्यू कोंबडया पैकी पाच कोंबडया उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठून तेथून भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठविले जातील. जिल्हाधिकारी कार्यालय यांना या संदर्भात माहिती पाठविली जाईल.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close