Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

पुण्यात धक्कादायक घटना!; काॅलसेंटरमधून घरी चाललेल्या तरुणीला रस्त्यात अडवून बलात्कार

पुणे : देशभरात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे. अशातच पुण्यात एका तरूणाचे अपहरण करून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील एक तरुणी राञी कॉल सेंटरमधील ड्युटी संपल्यानंतर घरी जात होती. यादरम्यान एका तरूणाने तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे, असे वृत्त आहे.
पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की, पीडित तरुणी ही खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये कार्यरत आहे. ती गुरुवारी राञी काम झाल्यानंतर घरी जात होती. त्यावेळी एका तरूणाने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्याने तिला गाठत मारहाण केली. नंतर बळजबरीने दुचाकीवर बसविले आणि खराडीतील एका ठिकाणी घेऊन गेला. तिथे तरुणीवर आरोपीनं बलात्कार केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्या तरुणीला येरवडा येथील गुंजन चौकात आणून सोडले.
झालेल्या घटनेने तरुणी हादरून गेली आहे. त्याच अवस्थेत तरुणीने तात्काळ घडलेली घटना मिञाला फोन करून सांगितली. त्यानंतर पीडित तरुणीने घडलेली घटना सांगितल्यानुसार तक्रार दाखल करून घेतली. घटना घडलेल्या त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. त्यात आरोपीची ओळख पटली. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला काही तासात शोधण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे विश्रांतवाडी पोलिसांनी सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close