Subscribe to our Newsletter
Loading
यशकथा

गोरगरीबांच्या पोटाची चिंता मिटवणारी शिवभोजन योजना


समाजातील गोरगरीब, निराधार, निराश्रित तसेच ज्यांना दोन वेळची पोटाची खळगी भरणे शक्य नाही, अशा व्यक्तींसाठी तसेच कोणीही भुकेले राहु नये या उद्देशाने शासनाने अत्यल्प दरात शिवभोजन योजना सुरु केली. हाताला काम नसलेले गरजू कुटुंब, सरकारी रुग्णालयात रुग्णांसोबत येणारे नातेवाईक, गोरगरीब यांच्यासह शिक्षणासाठी शहरांमध्ये आलेल्या विद्यार्थ्याच्याही पोटाची चिंता शिवभोजन योजनेने मिटवली असल्याची प्रतिक्रिया बदनापुर तालुक्यातील कुंभारी या गावातील विद्यार्थी अनिल सुखदेव ढवळे याने दिली.
जीवनामध्ये काहीतरी करुन दाखवण्याच्या उद्देशाने जालना येथे मी शिक्षणासाठी आलो. जालना येथील मत्स्योदरी महाविद्यालयातुन एम. कॉमचा अभ्यासक्रम पुर्ण करुन एमपीएससी ची तयारी करत आहे. घरामध्ये आम्ही तीघे भाऊ व दोन बहिणी. बहिणींची लग्ने झाली असुन माझा एक भाऊ औरंगाबाद येथे शिक्षण घेत आहे तर दुसरा भाऊ मजुरी करत आहे. आमचा घराचा चरितार्थ केवळ गावी असलेल्या दोन एकर शेतीमध्ये होणाऱ्या उत्पन्नावर चालत असल्याने शिक्षण घेण्यासाठी मोठी अडचण होते. जालन्यामध्ये चार मित्रांमध्ये भाड्याने रुम घेऊन मी राहुत गुजराण करत असुन रोजच्या जेवणाचीही मोठी पंचाईत होत असे. परंतु शासनाने समाजातील गोरगरीबांसाठी अत्यंत्य अल्पदरामध्ये सुरु केलेली शिवभोजन योजना ही वरदान ठरत आहे. या शिवभोजन योजनेच्या माध्यमातुन चपाती, भात, भाजी, वरण आदी पौष्टीक असा आहार देण्यात येतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये केवळ शिवभोजन योजनेमुळेच माझ्या दोन वेळच्या जेवणाची चिंता मिटली असुन गोरगरीबांची भुक मिटवणाऱ्या या उपक्रमाबद्दल अनिलने शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
26 जानेवारी, 2020 रोजी संपुर्ण राज्यामध्ये शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जालन्यामध्येसुद्धा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शासकीय रुग्णालयाच्या बाजुला असलेल्या शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जालना जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले असुन कोरोनाच्या काळातसुद्धा समाजातील गोरगरीबांच्या पोटाची भुक भागविण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातुन करण्यात आले. कोरोनाच्या अनुषंगाने या शिवभोजन केंद्रावार स्वच्छतेचे सर्व नियम पाळुन सामाजिक अंतराचे पालन करत गोरगरीबांना शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. माहे जानेवारी ते नोव्हेंबर, 2020 या कालावधीमध्ये संपुर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात 3 लाख 73 हजार 975 शिवभोजन थाळयांचे वाटप या योजनेच्या माध्यमातुन करण्यात आले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close