Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक ; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर


जळगाव : जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला आहे. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी ३८ मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी ४५ मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना २८ मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वी सांगली महागनरपालिकेतही भाजपकडे पुरेसे संख्याबळ असूनही महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला होता. तर उपमहापौरपद काँग्रेसला मिळाले होते. त्यामुळे आता सांगलीपाठोपाठ महाविकासआघाडीने जळगावातही भाजपचा टप्प्यात आल्यावर अचूक कार्यक्रम केल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदान घेण्याला भाजपने विरोध केला होता. महापौरपदासाठी प्रत्यक्ष मतदान व्हावे, असा आग्रह धरत भाजपने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली होती.ऑनलाईन मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. निवडणूक होण्यापूर्वीच जळगाव महानगरपालिकेच्या आवारात शिवसेनेच्या विजयाचे बॅनर्स झळकू लागले होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close