Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

इंधन दरवाढीच्या विरोधात सिल्लोड येथे शिवसेनेचे निदर्शने


     सिल्लोड :   केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने दरवाढ केली जात असल्याच्या निषेधार्थ शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे तसेच पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशानुसार महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, युवानेते अब्दुल समीर यांच्या मार्गदर्शनाखाली  सिल्लोड तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकात केंद्र सरकारच्या कारभारावर निशाणा साधत केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आले.
  केंद्र सरकार दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची सातत्याने दरवाढ करीत असून यात सर्व सामान्य जनतेचे हाल होत आहे. देशातील जनता कोरोना संकटाचा सामना करीत असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तेल कंपन्या कडून पेट्रोल डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंची सातत्याने दरवाढ केली जात आहे. केंद्र सरकारने इंधन तसेच जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात आणावे नसता याहून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.या प्रसंगी केंद्रातील भाजप सरकार जुलमी सरकार असून हे सरकार सामान्यांचा जाणीवपूर्वक छळ करीत असल्याची टीका तालुकाप्रमुख देविदास लोखंडे यांनी केली. तर डॉ. संजय जामकर, रघुनाथ घरमोडे, सुदर्शन अग्रवाल, मारुती वराडे आदिंनी केंद्रातील भाजप सरकारच्या दरवाढ बाबत जोरदार समाचार घेत दरवाढिचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.याबाबत शिवसेनेच्या वतीने नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक दामूअण्णा गव्हाणे, सतीश ताठे, अशोक सूर्यवंशी, सुदर्शन अग्रवाल, नॅशनल सूतगिरणीचे संचालज राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, जिनिग प्रेसिंग चे व्हाईस चेअरमन अनिस पठाण, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख बाबर, शंकरराव खांडवे, शेख सलीम हुसेन, जितू आरके, मतीन देशमुख, प्रशांत क्षीरसागर, सत्तार हुसेन, शकुंतलाबाई बन्सोड, शेख मोहसीन, सुधाकर पाटील, व्यापारी आघाडीचे अमृतलाला पटेल यांच्यासह युवासेना शहरप्रमुख शिवा टोम्पे, रवी रासने, विश्वास दाभाडे, दीपक वाघ, पांडुरंग जैवळ, कुणाल सहारे, संजय आरके, राहुल सपकाळ, आशिष कुलकर्णी,  मानसिंग राजपूत, गौरव सहारे, संतोष खैरनार,  फारूक पठाण, ईश्वर जाधव, सचिन पाखरे, राजेंद्र सिरसाट, संजय राकडे, शेख शमीम, एकनाथ शिंदे,सय्यद अजीज, सदाशिव तमखाने, फहिम पठाण, आनंद सिरसाट,कल्याण डवणे,संजय शिंदे, मॅचिंद्र पाखरे, रमेश पालोदकर, संभाजी हावळे, भावराव दुधे, जगन्नाथ कुदळ,आनंदा दुधे, कैलास इंगे,  तुकाराम दुधे, रघुनाथ कल्याणकर, इंदरसिंग दुधे आदींसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.Attachments area

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close