Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

शिवसेनेच्यावतीने आषाढीनिमित्त ऑनलाईन ‘देव माझा विठू सावळा’ कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या साठी बघत राहा www.mh20live.com

संभाजीनगर /औरंगाबाद ।: आषाढी एकादशीला देऊळांमध्ये आणि प्रेक्षागृहांमध्ये विठ्ठल-रखुमाईची भक्तिगीते, अभंग आणि गाणी ऐकण्याची संधी संभाजीनगरकराना वेगवेगळ्या भागांमधल्या रसिकांना मिळते. परंतु यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर अशा कार्यक्रमांना रसिक मुकणार आहेत.

मात्र शिवसेना संभाजीनगरच्यावतीने या आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘देव माझा विठू सावळा’ हा भक्तीगीतांचा कार्यक्रम यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन आयोजित केले असल्याचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे.

येत्या 1 जुलै रोजी वार बुधवार, सायं. 7.30 वाजता होणार आहे. आषाढी एकादशी निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवर http://www.facebook.com/iambadasdanve युट्यूबवर https://www.youtube.com/channel/UC8sBZh5CyQXGGtoR4tDO0WQ व इंस्टाग्राम https://instagram.com/iambadasdanve?igshid=lnwcg4055ucj यावर लाईव्ह विठ्ठलाची भक्तिगीते पाहता येईल तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबवर ऑनलाइन लाइव्ह प्रेक्षक घरी बसल्या सहकुटुंब विठ्ठल भक्तीने ओथंबून जाणाऱ्या भक्तीगीतांची अनुभूती घेऊ शकतात. येत्या 1 जुलै 2020 रोजी आषाढी एकादशी असून अनेक भक्त व वारकरी वारीत सहभागी होऊ शकणार नाही, पंढरपूरला दरवर्षी लोटणारा भक्तीचा महासागर अनुभवता येणार नसल्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी व वारकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close