Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औद्योगिक वसाहतीत उत्स्फूर्तपणे बंद पाळुन कोरोना विषाणू ची साखळी तोडण्याचे शिवसेना आमदारांचे आवाहन


ताज्या बातम्या साठी बघत राहा www.mh20live.com

संभाजीनगर 2 जुलै) दिवसेंदिवस करोना विषाणूचा प्रादुर्भाव हा वाढतच असून विशेषता बजाजनगर औद्योगिक परिसरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 4 जुलै ते 12 जुलै पर्यंत या औद्योगिक वसाहतीत लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे या धरतीवर आज बजाजनगर व परिसरातील औद्योगिक वसाहतीतील प्रमुख नागरिकांची बैठक घेऊन कोरोना विषाणु ची साखळी तोडण्याचे आवाहन यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे , आ .संजय शिरसाट , आ.प्रदीप जैस्वाल यांनी केले. यावेळी ठीकठिकाणी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना धीर देण्याचे काम आमदारांच्या वतीने करण्यात आले तसेच या कोरोना विषाणू चा वाढता संसर्ग याबाबत माहितीही देण्यात आली.
यावेळी बोलताना शिवसेनेचे तिन्ही आमदार म्हणाले की करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस या परिसरात वाढत असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत पण सतर्क राहण्याची गरज आहे तशी काळजी आपण घेतली पाहिजे लॉकडाऊन च्या वेळेस अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडणे मास्क , सोशल डिस्टन्स , सॅनिटायझर याचा वापर अवश्य करावा, लॉकडाऊन च्या वेळेस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे आदेशाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे,
उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे वाळुज एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता हर्ष साहेब,उपअभियंता मुळे साहेब,इजीनियर दापके साहेब, डॉक्टर दाते ,उपतालुकाप्रमुख सचिन गरड, बबन सुपेकर, कृष्णा राठोड ,उपसरपंच उषाताई हांडे, ग्रामपंचायत सदस्य कैलास भोकरे, बाळासाहेब गायकवाड,शशिकांत ढमढेरे, सागर शिंदे, काकाजी जीवरग उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close