Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची कोरोनावर मात सात दिवसानंतर सिग्मा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

संभाजीनगर : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कोरोनावर मात केली आहे. आज, १६ डिसेंबर रोजी त्यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. ९ डिसेंबर रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना सिग्मा हॉस्पिटलयात दाखल करण्यात आले होते. माझ्या प्रकृतीची शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई व लोकप्रतिनिधी – प्रशासकीय अधिकारी यांनी आस्थेने विचारपूस केली. आजारपणात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे धीर देणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.
यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, अ‍ॅड. आशुतोष डंख, युवासेना जिल्हा युवाधिकारी तथा नगरसेवक ऋषिकेश खैरे, नगरसेवक सचिन खैरे, कमलेश झवेरी, डॉ उन्मेष टाकळकर, डॉ. ज्ञानेश्वर झडे, डॉ. रोठे, आदींची उपस्थिती होती. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील सर्व जनता व तमाम शिवसैनिक यांनी केलेल्या प्रार्थना व दिलेल्या शुभेच्छासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आभार मानले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close