Subscribe to our Newsletter
Loading
ब्लॉग्ज

शरदराव

शरदराव
(शरदचंद्र पवार याना कृतज्ञता पत्र , इतिहासात तारामती व राजकारणात बारामती , ऊर्जेचे जादूगार शरद पवार . या तीन निबंध/ लेखांचे संक्षिप्त पद्यरूप विवरण )
शिवरायांचे पावन देशा
अवतरले नेते महान
शरदराव नाम तयांचे
महाराष्ट्राची अवघी शान
मराठा इतिहास गौरवी
स्वराज्य भूषण तारामती
राज्यशास्त्र होई गुरुधन
धडे गिरविता बारामती
पदे भूषविली सेवाभावी
सर्वधर्मीय सगेसोयरे
रयत ठेवुनी अग्रभागी
जीवन अर्पिले उणेंपुरे
उमेदीत रचले विक्रम
कैक केले मंत्री नामदार
कोळी माळी भटके वंचित
वरदहस्ताने कामदार
भूकंपात उध्वस्त किल्लारी
आपत्तीचा पडता अंधार
ठाण मांडून घटनास्थळी
कृतार्थ केला परोपकार
स्वार्थापोटी विसरून गेले
अदभुत किमया जादुई
रणसंग्राम सोडून जाता
प्रगट जाहली चतुराई
जीवन आपुले मुक्तग्रंथ
प्रत्येक पान कांचनमोती
पराकाष्ठा करून अनेक
अभंग ठेवली नातीगोती
गरजेची गुलाम दुनिया
आपण ऊर्जेचे जादूगार
त्रिवार घुमे नारा एकच
हितवादी शरद पवार

  • प्रा डॉ के एन अंबाड,लातूर
    मो नं 9423346151
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close