Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

शरद पवारांनी रस्त्यावर ताफा थांबवून दिला नवदांपत्याला आशीर्वाद


शरद पवारांनी पुन्हा एकदा आपलं मोठेपण दाखवून दिलं


सोलापूर -पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारत भालके यांच नुकतंच निधन झालं असून त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवार पंढरपुरात होते. सरकोली या गावी जाण्यासाठी शरद पवारांचा ताफा निघाला होता. मात्र शरद पवार यांनी इतक्या गडबडीतही ताफा थांबवून भेटायला आलेल्या नवदांपत्याला आशीर्वाद दिला.


शरद पवारांनी रस्त्यावर ताफा थांबवून दिला नवदांपत्याला आशीर्वाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार किती मोठे नेते आहेत हे त्यांचा जनसामान्यांशी असणारा संपर्क पाहिल्यावर लक्षात येतं. अनेकदा शरद पवार दौऱ्यावर असताना लोक आपुलकीने त्यांची भेट घेण्यासाठी येतात. शरद पवारही भेटायला आलेल्यांना कधी नाराज करत नाहीत. असाच प्रसंग नुकताच सोलापूरमध्ये पहायला मिळाला.

झालं असं की, पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील सूरज नवनाथ शिंदे व काजल हरी क्षिरसागर यांचा गुरुवारी विवाहसोहळा पार पडला. यानिमित्ताने दांपत्य ग्रामदैवताच्या दर्शनाला चाललं होतं. याचवेळी शरद पवारांचा ताफा तेथून चालला होता. त्यामुळे दांपत्य शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी थांबले. शरद पवारांनी यावेळी त्यांना नाराज न करता ताफा थांबवला आणि आशीर्वाद दिला. यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close