Subscribe to our Newsletter
Loading
निसर्ग चक्रीवादळमहाराष्ट्र

शरद पवार आज पासून कोकणच्या ‘वादळी’ दौऱ्यावर


मुंबई:गेले ६८ दिवस कोरोना लॉक डाऊन मुळे मुंबईतल्या सिल्व्हर ओक या आपल्या बंगल्यात वाचन,लेखन,चिंतन,कुटुंबियांशी सुसंवाद तसेच सहकारी आणि कार्यकर्त्यांशी फोनवरून सल्ला मसलत करणाऱ्या शरद पवार यांनी आता बाहेर पडून कामाला भिडण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा पहिला दौरा दिनांक १० जून पासून निसर्ग वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या कोकणातील रायगड,पालघर,ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गाठीभेटींनी सुरु होत आहे.निसर्ग वादळाने ऐन वेळी दिशा बदलल्यामुळे नुकसानीची तीव्रता कमी असली तरी पुणे,ठाणे,पालघर,रायगड जिल्ह्यातील फळपिकांचे तसेच अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. या भागातील काजू, फोफळी, आंबा, आणि नारळाच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर जाणार आहेत .शरद पवार उद्या (९ जून) रायगड जिल्ह्याला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची आणि प्रशासनाकडून सुरु असलेल्या कामांची माहिती जाणून घेतील. त्यानंतर १० जून रोजी ते रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देणार आहेत.या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे.अनेकांचे घरे उध्वस्त झाली आहेत.त्यांनाही मदत मिळणे आवश्यक असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close