Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर ओढावली नामुष्की, बालेकिल्ल्यातच लोटांगण

: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून मालिका 2-1 फरकाने जिंकली आहे. भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर (Border Gavaskar trophy) पुन्हा एकदा आपलं नाव कोरलं आहे. लक्ष्याचा पाठलाग करत असताना भारताला 328 धावांची आवश्यकता होती. शुभमन गिलच्या उत्कृष्ठ खेळीमुळे भारताची सुरुवात चांगली झाली होती. त्यामुळे भारताला या सामन्यात लय गवसली आणि एकीचे बळ दाखवत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. कारण गेल्या 32 वर्षांपासून ब्रिस्बेनच्या या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाने आपलं एकतर्फी वर्चस्व कायम राखलं होतं.
भारताने चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला धुळ चारत त्यांचं ऐतिहासिक वर्चस्व मोडीत काढलं आहे. म्हणून या विजयाचं महत्त्व वाढतं. गेल्या 32 वर्षांत ऑस्ट्रेलिया या मैदानावर कधीही पराभूत झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्यात यजमान संघाला चारी मुंड्या चित करण्याची कामगिरी भारताच्या तरुण शिलेदारांनी करून दाखवली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडिजकडून 1988 मध्ये पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर तब्बल 32 वर्षे ऑस्ट्रेलिया या मैदानात पराभूत झाली नव्हती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close