Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

शाहीर रामानंद उगले यांच्या आवाजातील नव्या गीताचे 1 जुलै रोजी होणार प्रसारीत


जालना/mh20live Network

जालना जिल्ह्याचे नाव देशाच्या कानाकोपर्‍यात पोहचवणारे आणि विदेशात जाऊन आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचे सादरीकरण करणारे तसेच विविध मराठी वाहीन्यावर आपल्या आवाजाने मराठी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध कणारे शाहीर रामानंद उगले यांच्या आवाजातील आणि विलास अटक यांनी संगीतबध केलेले गीत दि. 1 जुलै रोजी प्रसारीत होणार आहे.
घुंगराची गाडी आली आपुल्या घरी…
करू देवाची चाकरी अन गाठूया जेजुरी…
शाहीर रामानंद उगले यांनी झी मराठी, झी युवा, सोनी मराठी, कलर्स कराठी यासह अनेक वाहीन्यावर आपल्या जादूई आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. 1 जुलै रोजी प्रसारीत होणार्‍या या गीताचे लेखन विलास अटक यांनी केले असून त्या गीताच्या प्रमो गीताने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्या गाण्याला संगीत बध करुन शाहीर रामानंद उगले यांच्या आवाजात हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गीताच्या आगामी प्रसारणाला प्रसिध्द गायक तसेच महाराष्ट्राचा महागायक म्हणून ओळख असलेले अभिजीत कोसंबी, युवा सिंगर एक नंबर फेम चेतन लोखंडे यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या गीताला युवा सिंगर एक नंबर मालीकेचे विजेते कल्याण उगले, अनिल घोगरे, दर्शन पेडगावकर, राहीत काटे, किशोर धारासुरे, श्वेता कुलकर्णी, बाळकृष्ण धारबळे, सुकन्या मिसाळ, विशाल उगले यांनी दिली आहे.
सदरील गीत संबंध महाराष्ट्राच्या मनात गुंजनार असून प्रत्येकाच्या जिभेवर रुळत आहे. भक्तीची ती आर्तता लक्षात घेऊन, तेच गीत प्रत्येक घराघरात वाजून जेजुरीच्या खंडेरायाची भक्ती व्हावी, या उद्देशाने येत्या 1 जुलै ला ते गाणं यु-ट्यूब द्वारा प्रसारीत होणार आहे. त्यांच्या या गीताच्या प्रसारणानिमीत्त जिल्हाभरातुन शुभेच्छा येत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close