Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

शेतकऱ्यांचे कपाशी पिकांचे अतोनात नुकसन या शेतकऱ्यांला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी शिवसेना शाखा अध्यक्ष ईश्वर शेळके यांची मागणी

सोयगाव / प्रतिनिधी 
सोयगाव तालुक्यातील डाभा येथील अल्पभूधारक शेतकरी विक्रम भिमराव दांडगे रा.डाभा ता.सोयगाव गट.नंबर ६१ शिवार डाभा यांची पाच एक्कर कपाशी पूर्णपणे पाण्यात आहे तर काही वाहून गेली आहे. यांना शासनाने त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना शाखा प्रमुख ईश्वर शेळके व सहसचिव विठ्ठल दांडगे यांनी केली आहे.
रविवार पासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिके पाण्यात बुडाली, सोयाबीन व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज असल्यानेडाभा,सावळदबारा व सोयगाव परिसरात तालुक्यात च एक आठवड्यापासून मूसळधार पाऊस पडत असून मंगळवारी  देखील पावसाचा जोर कायम होता.सततच्या पावसामुळे डाभा येथील शेकडो शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडाली आहेत. असून कापसाची बोंडे सडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्याची मागणी होत आहे.सोयगाव तालुक्यातील सावळदबारा, देव्हारी, पिंपळवाडी, चारुमुतीँ, डाभा,परिसरात मागील महिन्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्यात बुडाली आहेत. मंगळवारी देखील पावसाचा जोर कायम राहिला. पावसाचा जोर कायम राहिला तर खरीपाच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांग नदीच्या काठावरील काही अनेक शेतात पाणी घुसल्याने सोयाबीन, कापूस व तुरीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इतर ठिकाणी देखील सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. सततच्या पावसामुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोयाबीन, तुर व कापसाचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अति पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटत आहेत. तसेच कापसाची बोंडे सडत आहेत. या अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोयगाव  तालुक्यातील शेतकरी वर्ष २०१२  पासून कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा सामना करीत आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. तसेच याही वर्षी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले.शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना १० हजार रुपये क्विंटलने सोयाबीनच्या पेरणीच्या टाईमाला खरेदी करावी लागली. परंतु सध्या शेतकऱ्यांचा सोयाबीन बाजारात येताच सोयाबीनचे भाव ५ हजारांपेक्षाही कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ विमा मंजूर करून शंभर टक्के नुकसानीचे अनुदान तात्काळ देण्याची मागणी डाभा येथील शेतकरी व सरपंच राहूल हेल्लोडे,सामाजिक कार्यकर्ते तेजराव गवई, रामेश्वर सुरडकर, आनंदा लोखंडे, योगेश बावणे,गोपाळ दांडगे, श्रीहरी मोरे,विजय जाधव, बद्री पाटील, सुनील दांडगे, सुनिल कवीश्वर, शालिकराम पवार करत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close