कृषी मंत्री दादा भुसे : जिल्ह्यात रेशिमचे काम समाधानकारक
जालना जिल्ह्यात रेशीमचे काम अत्यंत समाधानकारक असुन अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे यासाठी जिल्ह्यात रेशीम शेतीला अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगत जालन्यातील सीडहबचा प्रश्न प्रलंबित आहे. जालन्यामध्ये सीडहब होण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने पहिल्यांदा कापूस व सोयाबीन पिकाच्या मुल्यसाखळी बळकटीकरणासाठी रुपये 1 हजार कोटींची तरतुद केली असल्याचे सांगत नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी रुपये 100 कोटींची तरतुद करण्यात आली असल्याचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कूटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, यावर्षी समाधानकार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बि-बियाणे तसेच खतांचा पुरवठा होईल, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी पीककर्जाची मोठ्या प्रमाणात गरज असते.
https://mh20live.com/transport/ दुचाकीसाठी नवीन क्रमांक मालिका
शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळावे असे सांगत पोकरा योजनेमध्ये सामुहिक व वैयक्तिक स्वरुपाचा लाभ देण्यात येतो. या योजनेत प्रलंबित असलेले प्रस्ताव तसेच नवीन प्रस्तावांना गतीने मंजुरी मिळावी. त्याचबरोबर कृषि विभागात प्रलंबित असेलेली पदे तातडीने भरण्याची मागणीही त्यांनी कृषीमंत्र्यांकडे यावेळी केली. यावेळी बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी जालना जिल्ह्याची तर संबंधीत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्याचा संगणकीय सादरीकरणाद्वारे खरीप हंगामाची माहिती सादर केली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये राज्यात औरंगाबाद जिल्हा प्रथम आल्याबद्दल जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण तसेच बँक व्यवस्थापक श्री वाडेकर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.प्रारंभी कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कृषि विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती व जनजागृती वाहनांस हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.