Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद:शहर परिसरात कलम 144 (1)(3)मनाई आदेश लागू

औरंगाबाद, दिनांक 23 :महाराष्ट्र शासन, गृहविभाग मुंबई यांचेकडील आदेशान्वये फौजदारी दंडप्रक्रिया संहिता सन-1973 चे कलम 144(1) व (3)अन्वये प्राधिकृत अधिकारी म्हणून औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144(1) व (3) अन्वये तसेच महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, नवीन मंत्रालय मुंबई यांचे अधिसूचनेनुसार सक्षम प्राधिकारी म्हणून कोरेोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 144(1) व (3) प्रमाणे लागु केलेले मनाई आदेश कायम करण्यात आले आहेत. कोणत्याही व्यक्तीला औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली या ठिकाणी संचार, वाहतूक फिरणे, उभे राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करणारा आदेश 05 जानेवारी पर्यंत रात्री 11.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यत लागु करीत आहे, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी निर्गमित केले आहेत.

या आदेशात बाबींमध्ये पाच पेक्षा जास्त लोक जमा होऊ शकणार नाहीत, अत्यावश्यक बाबी वगळता नागरिकांची हालचाल, आवागमन (movement) पूर्णपणे प्रतिबंधीत राहील. यांचा समावेश आहे तर सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा चालू राहतील (हॉस्पीटल, क्लिनीक, मेडीकल शॉप्‌स), औद्योगिक कारखाने चालू राहतील, कारखान्यातील कामगार व माल वाहतुक चालू राहील. अत्यावश्यक सेवा सुविधा चालू राहतील. माल व मालवाहतूक या संबंधाने चढण व उतरण सेवा यांना या बाबींना परवानगी राहील.

या ठिकाणी सर्व संबंधितांना आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्यास फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन , सहाय्यक पोलीस आयुत तसेच परिमंडळीय पोलीस उप-आयुक्त कार्यालय यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

सदर आदेश पोलीस, आरोग्य, अत्यावश्यक सेवा (उदा. वीज, पाणी पुरवठा दळणवळण, दूरसंचार) अत्यावश्यक वस्तू व सेवा यांची वाहतुक, कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार टाळण्यासाठी कार्यरत संबंधित आपत्ती निवारण व्यवस्थापन  या मधील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व माझ्यावतीने परवानगी दिलेल्या व्यक्ती यांना लागु नसतील. मात्र त्यांनी त्यासाठी त्यांचे ओळखपत्र  व सदर विशेष कार्यासाठी नेमणुकीबाबतचे आदेश सोबत बाळगणे बंधनकारक असेल त्याचप्रमाणे नमुद मुभा असलेल्या सर्व व्यक्तींना त्यांचे विहित ओळखपत्र अथवा आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स , पॅन कार्ड इ. सोबत बाळगणे अनिवार्य राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.  

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close