Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

युवा संगीतकारांना हिंदुस्थानी संगीतासाठी शिष्यवृत्ती

युवा संगीतकारांना हिंदुस्थानी संगीतासाठी शिष्यवृत्ती

औरंगाबाद नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) ही संस्था भारतात कला आणि संस्कृती संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक वेगवेगळे उपक्रम सातत्याने हाती घेत असते. २००९ सालापासून सिटीबँकेसोबत भागीदारीतून एनसीपीए हिंदुस्थानी संगीतामध्ये (गायन आणि वाद्य वादन) उच्च प्रशिक्षण मिळवू इच्छिणाऱ्या युवा गुणी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत आहे.  यंदाच्या वर्षी सिटी-एनसीपीए शिष्यवृत्ती गायन – खयाल / धृपद आणि आघातवाद्य – तबला / पखवाज यासाठी दिल्या जात आहेत.  प्रवेशिकांसाठी वयोगट १८ ते ३५ वर्षे निश्चित करण्यात आला असून अर्ज १५ जानेवारी २०२१ पर्यंत स्वीकारले जातील. शिष्यवृत्ती योजनेबद्दल माहिती देताना एनसीपीएभारतीय संगीत विभागाच्या हेड – प्रोग्रॅमिंग डॉ. सुवर्णलता राव यांनी सांगितले, “युवा पिढीला संगीताविषयी वाटणारी आवड आणि त्यांच्या कला-कौशल्यांना प्रोत्साहन देणे हा आमच्या या उपक्रमाचा उद्देश आहे.  या शिष्यवृत्तीसाठी देशभरातून मोठ्या संख्येने अर्ज येतील अशी अपेक्षा आहे.”     

पात्रता निकष व इतर महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराचा बायोडेटा हा या शिष्यवृत्तीसाठी त्याचा / तिचा अर्ज म्हणून विचारात घेतला जाईल.  यासाठी इतर कोणताही स्वतंत्र फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. 
  • वयोमर्यादा:

खयाल / आघातवाद्य – १८ ते ३० वर्षे (१ मार्च २०२१ रोजी)

धृपद – १८ ते ३५ वर्षे (१ मार्च २०२१ रोजी)

  • एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत संगीत क्षेत्रातील इतर शिष्यवृत्ती / अनुदान ज्यांना मिळालेले आहे असे उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र नाहीत. 
  • कोणत्याही कंपनीमध्ये पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ नोकरी / काम करत असलेले उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकत नाहीत.
  • व्यावसायिक संगीतकार तसेच ज्यांना ऑल इंडिया रेडिओकडून ‘ए’ ग्रेड मिळालेली आहे, ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र नाहीत. 
  • कुरिअरमार्फत हार्ड कॉपी स्वरूपात मिळालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.  वर नमूद करण्यात आलेल्या ईमेल आयडीवर पाठवलेले अर्जच फक्त विचारात घेतले जातील. 
  • या शिष्यवृत्तीसाठी फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. 
  • १५ जानेवारी २०२१ नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • एनसीपीए निवड समितीचा निर्णय अंतिम मानला जाईल. 

सिटी-एनसीपीए परफॉर्मिंग आर्टस् शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करायचा:

या शिष्यवृत्तीसाठी उमेदवारांनी त्यांचे अर्ज (संगीत शिक्षणाविषयीची माहिती देणारा बायोडेटा) ईमेलमार्फत [email protected] या पत्त्यावर १५ जानेवारी २०२१ पर्यंत पाठवावेत.

मिळालेल्या अर्जांमधून ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांची ऑडिशन फेब्रुवारी २०२१ मध्ये घेतली जाईल.  ही ऑडिशन बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार एकतर ऑनलाईन किंवा मुंबईत एनसीपीएमध्ये होईल.     

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close