Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

सावित्री माय तुझ्या मुळे

सावित्री माय तुझ्या मुळे
भारतातील पहिली महिला शिक्षिका स्त्री मुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या पुढ शिक्षणाच्या पुरस्कर्ता अंधारात प्रकाशाचा मार्ग दाखवानारी समस्त नारी जातीच्या वेदना संपवनारी स्त्री जातीला गुलामीच्या बेडीतुन बाहेर काढनारी जिवंत पनी मरन यातना भोगनार्या जिवांना जिवदान देनारी महिलांची कैवारी स्वाभिमानी कर्तृत्ववान क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांचा जन्म दिवस ह्या वर्षी पासुन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
मानवासाठी शिक्षन हेच मुलभुत व प्रभावी साधन आहे हे जाननार्या सावित्रीबाई ह्या भारतातील थोर शिक्षण तज्ञ होत्या माणसाला मानुस ताठ मानेने समाजात व जिवनात जगावे हा त्यांचा विचार होता
शिक्षन हे समाज परिवर्तनाचे साधन आहे पन केवळ साक्षर करण्यासाठी शिक्षण द्यायचे नव्हते तर शिक्षनामधुन समाज जागृती व जुन्या रूढी भोळ्या समजुती अंधश्रद्धा ह्या गोष्टीला समाजातुन समूळ नष्ट करावयाचे होते.
सावित्रीबाई च्या कार्य कर्तृत्वावर ऐक नजर टाकली तर आपनास असे दिसेल की संपूर्ण मानव जातीवर उपकार केले चार भिंतीत स्वयंपाक, ऊष्टी काढणे, ह्या बंधनात अडकून पडलेल्या स्त्री ला जगण्याची आशा दिली स्त्री ही केवळ मुलांना जन्म घालनारी मशीन नसुन तीला पन मन आहे वेदना आहे हे इथल्या प्रस्थापितांना त्यांनी ठणकाऊन सांगीतले त्या कुणालाही घाबरत नसत खंबीरपणे ठाम आपल्या विचारांच्या एकमतावर ऊभ्या असत.
एका सामान्य निरक्षर शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली सावित्री कधी ज्योतिबांच्या सोबत लग्न झाल्यानंतर त्यांच्या हाताखाली शिक्षणाचे धडे घेत घेत सावित्री ज्ञानयोगिनी बनली.
समाजातील महिलांची हेळसांड त्यांच दु:ख हे त्या उघड्या डोळ्यांनी पहात होत्या त्यांच्या मनात विचार आला महिलांना साक्षर केले तर आणि तो विचार त्यांनी ज्योतिबांच्या समोर ठेवला.
ज्योतिबा व सावित्री ह्यांनी पुण्यात मुलींची शाळा सुरू केली पन समाजात काही लोकांना स्त्रीयांना शिक्षन देणे आवडले नाही. जर बाई शिकली तर कोप होईल असे काही भामटी मंडळी बोलली कारण बाई शिकली तर ऊद्या आम्हाला बोलू देनार नाही सार तीच्या हातात जाईल ही भिती त्या लोकांना बसली होती.
पन सावित्री व ज्योतिबांनी स्वताच्या घरादाराची पर्वा न करता नारी जातीच्या कल्याणा साठी समाजकंटकांची बोलणी खाऊन शेन माती चिखलाचे गोळे सावित्री च्या अंगावर फेकण्यात आले पन ती शुर महिला घाबरली नाही शाळेत रोज जायचे मुलींना शिकवायचे हा उपक्रम सतत चालू ठेवला .
निरक्षर महीलासांठी पौढ शाळा सावित्रीबाई ने काढली आपले सारे तरूणपन सावित्रीबाई ने समाजातील महिलांसाठी घालवले. सावित्री बाई ने समाजातील विधवा महिलांना पुन्हा विवाह करण्यास भाग पाडले तरून पनात विधवा झालेल्या वासनेच्या शिकार झालेल्या गर्भवती महिलांना त्यांनी आसरा दिला व त्यांचे संगोपन केले.बाल विवाह च्या त्या विरोधात होत्या विधवा मुलींचे डोक्यावरील केस त्या कापुन नये म्हणून त्या निर्भीडपणे बोलायच्या.
समाजातील भोंदूबाबा व अंधश्रद्धा त्या सडकुन टिका करायच्या
जिवनात त्यांना खुप अडचणी आल्या पन जगाकडे पहाण्याची दृष्टी शांत विरक्त होती. माझ शिक्षणाच कार्य कधीही सोडणार नाही हे त्यांनी उघडपणे समाजाला सांगीतले होते.
सावित्रीबाई नी रात्रंदिवस एक केला व समाजातील महिलांना सुशिक्षित केले
लोकांच्या शिवा शेन चिखल अंगावर घेत सावित्री बाईनी शिक्षणाचा गाडा चालू ठेवला
एका नववारी साडीतल सावित्रीबाई नी महिलांना एक अलौकिक शिक्षणाची शक्ती दिली.
समाजातील लोकांनी केलेला सारखा अपमान सहन करत सावित्री बाई ने नारी जातीचा उद्धार केला.
त्यांच्या जिवनात हाल अपेष्टा झाल्या पन त्यांची एक वृत्ती दिसुन आली
आळस, परावलंबन हे दुर्गुण अंगी वाढू द्यायचे नसतील तर विद्यादान हे सर्वात मोठे दान आहे विद्या देनारा व विद्या घेणारा त्या मुळे खरोखर मानुस बनतो अस त्या म्हणायच्या.
आज सावित्री च्या शिक्षनामुळे महिला इंजिनियर ,डाॅ, पंतप्रधान, राष्ट्रपती, वकील, पायलट, कंडक्टर, शिक्षक ग्रामसेविका नगर सेविका, सरपंच आता सैन्यात महिलांना स्थान दिल गेल आहे.सावित्रीबाई मुळे महिला लेखिका, कवयित्री, कादंबरीकार हे सर्व ती शिक्षनामुळे होत आहे.
3 जानेवारी हा दिवस क्रांतीहोती महानायीका सावित्रीबाई फुले ह्याचा जन्म दिवस हा शिक्षक दिवस म्हणून आपन साजरा करनार आहोत.
घर ,कार्यालय ,शालेय संस्था ह्यांनी हा दिवस ऊत्सवा सारखा साजरा करावा
समस्त नारी जातीवर जे उपकार सावित्री बाई ने केलेत ते हजार जन्म घेतले तरी फिटनार नाहीत.खुप आणि मुल येवढ्या पुरती मर्यादित असलेल्या स्त्रीला सन्माना ने जगण्याची ताकत शिक्षनामुळे मीळाली.
सावित्री ज्योतिबा ह्या जोडीने पुरुषांच्या बरोबरीने शिक्षणाची दारे महिला सताड उघडी करून दिली.
स्त्री ही अबला नसुन सबला आहे हे दाखवून दिले. सावित्री च्या ऊत्सवाला लोकमान्यते बरोबर राजमान्यता सुध्दा मीळाली आहे
घराघरात दारी रांगोळी, दिवे, घरात गोड पदार्थ करा सावित्रीवर गायण वाचण प्रबोधन करा
सावित्री ची वेशभूषा करा विविध स्पर्धा चे आयोजन करा
त्या काळात प्रस्थापितांच्या विरोधात ऊभे राहून सावित्री ने शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात प्रचंड ऊल्लेखनिय काम केले महामारीच्या प्लेग मधे सावित्री नी समाजाची सेवा केली.
सावित्रीबाई वर लिहले तितके कमीच आहे. अश्या विश्ववंदनिय ज्ञानयोगिनीला
शेवटी म्हनाव वाटत
सावित्री माय तुझ्या मुळे आज आम्ही महिला सुखात आहोत.
लेखिका
सुरेखा पाटील रावणगावकर
राजीव गांधी विद्यालय
नांदेड

टिप..-सबधीत लेखाशी ,एम एच20लाईव्ह नेटवर्क, एम.एच20लाईव्ह , जबाबदार नाही, लेखकच जबदार आसेल..

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close